जबरदस्तीनं लग्न, शारीरिक संबंध आणि नंतर...; लग्नाच्या नावावर अभिनेत्रीची फसवणूक

पाहा काय म्हणाली अभिनेत्री...

Updated: Oct 13, 2022, 02:56 PM IST
जबरदस्तीनं लग्न, शारीरिक संबंध आणि नंतर...; लग्नाच्या नावावर अभिनेत्रीची फसवणूक title=

मुंबई : मोठ्या शहरांमध्ये खोटं बोलून लग्न करणं फसवणुकीचे असे अनेक प्रकार सामान्य आहेत. अनेक वेळा आपल्या वयाच्या निम्म्या वयाच्या मुलींशी लग्न करतात आणि नंतर त्यांचे शारीरिक शोषण करतात. मात्र, बऱ्याचवेळा या घटना समोर येत नाही, त्या मुलींना धमकावून किंवा मग त्यांना धाक दाखवून गप्प केलं जातं. असाच काहीसा प्रकार एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत झाला आहे. खोटं लग्न आणि नंतर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला बळी पडून ही अभिनेत्री त्या व्यक्तीच्या जाळ्यात आपण कसे अडकलो आणि लग्नाच्या नावाखाली आपली कशी फसवणूक केली या विषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

हेही वाचा : वैवाहिक जबाबदारीतून मुक्त होत 'या' अभिनेत्रींनी निवडलं फिल्मी करिअर

अभिनेत्रीनं नुकतीच 'नवभारत टाइम्स'ला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीनं तिच्यासोबत घडलेला हा संपूर्ण प्रकार सांगितला आहे. पीडित अभिनेत्रीनं सांगितलं की, मेहमूद हसन कादरी यांनी तिला भव्य लग्न करण्याचे वचन दिले होते, परंतु त्यानं काही पाहुण्यांसमोर एका खाजगी हॉटेलमध्ये लग्न केलं. लग्नानंतर मेहमूद हसन कादरीचा खरा चेहरा तिच्यासमोर आला. अभिनेत्रीने सांगितलं की हसन कादरीनं तिला चार महिने कोंडून ठेवलं आणि कोणालाही भेटू दिलं नाही. तो तिला मारहाण करायचा. त्यानं अभिनेत्रीच्या अंगावरील टॅटू मिटवण्यासाठी मेणबत्तीही पेटवली. मेहमूद हसन कादरीच्या वाढत्या अत्याचाराला कंटाळून अभिनेत्रीनं सगळ्याआधी ओशिवारा पोलिसांशी संपर्क साधला परंतु त्यांनी रिपोर्ट लिहिण्यास नकार दिला.

हेही वाचा : अजय देवगण कायद्याच्या कचाट्यात, लखलखत्या कारकिर्दीचं काय होणार?

या विषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, 2021 लॉकडाऊनमध्ये त्यांनी लग्न केल. अंधेरीत राहणाऱ्या हौवा नावाच्या या ओळखीच्या व्यक्तीच्या नातेवाईकानं माझी फसवणूक केली. त्या मेहमूद हसन कादरीचं आधीच लग्न झालं होतं आणि त्याला मुलं होते. यामुळे मी त्याला विचारलं की तुला लग्न करायचं आहे का? त्यावर मेहमूद हसन कादरी म्हणाला, त्याची पत्नी ही चालू शकत नाही तिच्या पायाच्या काही समस्या आहेत. माझा भारतात मोठा व्यवसाय आहे. परदेशातही जावं लागतं. माझी पत्नी सुंदर असावी, तिला कार चालवता यावी आणि माझ्यासोबत तिनं व्यवसायात करावा अशी माझी इच्छा आहे.'

हेही वाचा : अंकिता लोखंडेकडे गुडन्यूज; Photo शेअर करत काय म्हणतेय एकदा पाहाच

पुढे अभिनेत्री म्हणाली की, मेहमूदशी बोलत असताना खूप वेळ निघाला आणि रात्रीचे बारा वाजले. त्यानंतर मी घरी जाणार तर हौवा आणि इतर लोकांनी मला घरी जात आहेत तर रस्त्यात मेहमूदला ड्रॉप कर असं सांगितलं. मी मेहमूदला घरी ड्रॉप करायला गेले तर त्यानं जबरदस्तीने घरी नेण्यास सुरुवात केली. अभिनेत्रीनं त्याला नकार देताच तो म्हणाला, 'तुम्ही इंडस्ट्रीतील आहात. तुम्हांला काय प्रॉब्लेम आहे? तू माझ्या घरी चल तुला माझ्यावर विश्वास होईल.  मी नकार दिला आणि म्हणाले की मी इतक्या लवकर कोणाशीही मिसळत नाही. त्यानंतर मेहमूदनं त्याच्या सुनेला फोन करून सांगितले की, मी पाहुणे घेऊन येत आहे. तो मला त्याच्या कार्टर रोडवरील घरी घेऊन गेला. संपूर्ण इमारत त्याच्या मालकीची आहे. त्यानं मला घरी नेले आणि पहिल्या मजल्यावरच्या दोन खोल्या दाखवल्या आणि मी हे तुझ्या नावावर करतो आणि तुला सुरक्षा देतो. माझ्याशी लग्न कर. दुसऱ्या दिवसापासून रोज 7-8 वाजता फोन करून याविषयी बोलायला सुरुवात केली. हसन कादरी यांनी माझी आणि त्याची जबरदस्ती भेट घालून देली. एक-दोनदा त्याच्या घरी नेले. त्याची सून आणि मुलांशी भेट घालून दिली. 

हेही वाचा : 'दृश्यम 2' विजय साळगावकरच्या अडचणीत होणार वाढ, तब्बु साकारणार 'ही' भूमिका

मेहमूदच्या आधी दोन पत्नी होत्या, त्या विषयी मला माहित नव्हत आणि माझं लग्न लावण्यात आलं. त्यानं मला ओशिवारा येथे एक फ्लॅट भाडेतत्वावर दिला आणि तो एक दिवसा आड रात्री दोन वाजता किंवा दोन वाजेनंतर घरी यायचा. त्यानें निकाह करण्यासाठी जबरदस्ती केली आणि शारीरिक संबंधांसाठी देखील जबरदस्ती केली. मी त्याला सांगितलं की निकाहच्या आधी असं काही करणार नाही हा गुन्हा आहे. त्यानं माझी फसवणूक करत माझ्याशी निकाह केला. त्यानंतर मेहमूदनं माझे सगळे कपडे फाडले आणि शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती केली. मी रात्रभर रडत होते आणि त्याची विनंती करत होते की मला सोड, मला त्रास होतोय. त्यानं मला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. माझं परिस्थिती खूप गंभीर झाली. 

आणखी वाचा : सतत चित्रपट फ्लॉप होऊनही अक्षयनं 'रामसेतू'साठी घेतलं इतकं मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क

हे सगळं 15 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झालं आणि मार्चपर्यंत परिस्थिती खूपच खराब झाली. त्यानं सेक्स टॉयचा वापर केला. अभिनेत्री खानच्या मते, तिला जाळ्यात अडकवण्यात हौवाची मुख्य भूमिका होती. त्यानं मुद्दाम मला फोन करून मेहमूद हसन कादरी नावाच्या माणसाशी ओळख करून दिली.