'निसर्गाच्या नावाखाली....,' विद्युत जामवालला अभिनेत्याने फटकारलं, म्हणाला 'झाडाजवळ आग लावून...'

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने हिमालयातील काही फोटो शेअर केले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात त्याने नग्नास्थेत घालवलेले क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर त्या फोटोंवर अनेकजण व्यक्त होत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Dec 11, 2023, 04:53 PM IST
'निसर्गाच्या नावाखाली....,' विद्युत जामवालला अभिनेत्याने फटकारलं, म्हणाला 'झाडाजवळ आग लावून...' title=

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने हिमालयात निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विद्युत जामवाल नदीत आंघोळ करण्यापासून ते झाडाजवळ स्वयंपाक करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये विद्युत जामवाल न्यूड दिसत आहे. या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, यातील एका फोटोवर अभिनव शुक्ला याने नाराजी जाहीर केली आहे. या फोटोत विद्युत जामवाल जिवंत झाडाजवळ चूल पेटवून त्यावर अन्न शिजवताना दिसत आहे. 

विद्युत जामवाल दरवर्षी हिमालयात जातो. त्याच्यासाठी आता दरवर्षी नित्याचा भाग झाला आहे. त्याने इंस्टाग्रामला फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, "हिमालयातील माझी रिट्रीट, 14 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली होती. मला जाणीवही झाली नाही, आणि आता हा माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. दरवर्षी 7 ते 10 दिवस मी एकटाच घालवतो. ऐषोआरामाच्या आणि रम्य जीवनातून येथे आल्यावर  मला माझा एकटेपणा शोधण्यात आणि 'मी कोण नाही' हे जाणून घेण्याचे महत्त्व जाणण्यात आनंद होतो, जो 'मी कोण आहे' हे जाणून घेण्याची पहिली पायरी आहे तसंच निसर्गाने प्रदान केलेल्या ऐशोआरामात शांततेत स्वत:ला सांभाळून घेत आहे. मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सर्वात सोयीस्कर आहे आणि मी निसर्गाच्या नैसर्गिक वारंवारतेशी संपर्क साधतो".

विद्युत जामवालच्या पोस्टवर अभिनेता अभिनवने टीका केली आहे. स्वयंपाक करण्यासाठी त्याने झाडाजवळ आग लावल्याने अभिनवने नाराजी जाहीर केली आहे. त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, "निसर्गाशी जोडला जात आहेस याचा आनंद आहे. काय खावं आणि काय घालावं हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. पण जिवंत झाडाच्या शेजारी आग लावणं, हे निसर्गासाठी योग्य नाही. तसंच कॅम्पिंग आणि आऊटडोअरच्या नियमांविरोधात आहे (जगण्याचा प्रश्न आहे तोवर). तो दगडी स्टोव्ह खूपच अकार्यक्षम दिसत आहे, जर तुम्ही 6 ते 7 दिवस राहणार असाल तर डाकोटा पद्धतीची आग योग्य आहे. बुशक्राफ्ट शाळेत शिकवण्याची गरज आहे". 

दरम्यान विद्युत जामवाल क्रॅक या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासह नोरा फतेही, अर्जून रामपाल आणि अॅमी जॅक्सन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 24 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.