Nana Patekar : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांनी नुकतीच तिरुवनंतपुरममध्ये असलेल्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीविषयी यावेळी चर्चा केली आणि म्हणाले की गेल्या 50 वर्षांपासून केरळमधील कोणत्याही दिग्दर्शकानं त्यांना चित्रपटासाठी कॉल केला नाही. चला तर जाणून घेऊया काय म्हणाले नाना पाटेकर...
नाना पाटेकरांनी या 28 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात पोहोचले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की 'मी इथे येऊन खूप सन्मानित असल्याचे वाटते. मला IFFK साठी आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. मी 32 वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळमध्ये पहिल्यांदा आलो होतो. सामाजिक-राजकीय परिस्थितीत काहीही बदल झालेले नाही. लोक मनाने खूप विचार करतात. त्यामुळेच भाषा वेगळ्या असल्या तरी बोलणं सोपं होतं. हे असंच व्हायला हवे.'
मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी सांगितलं की 'मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करण्याची खूप काळापासून इच्छा आहे. तर पाच दशकांच्या करिअरमध्ये त्यांना कधीच मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही.'
नाना पाटेकर पुढे म्हणाले की, 'गेल्या 50 वर्षांमध्ये येथे (केरळ) मधील एकाही दिग्दर्शकानं कधी त्यांना कॉल केला नाही. याचा अर्थ आहे की मला एक अभिनेत्याच्या रुपात स्वत: मध्ये सुधारणा करायला हवी.' मी खूप प्रयत्न करेन आणि तुम्हाला निराश करणार नाही. या कार्यक्रमाची सुरुवात केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून झाली. त्यांचा एक रेकॉर्डेड संदेश आधी दाखवण्यात आला. उद्घाटन समारंभात केन्याई फिल्म निर्माता वानूरी काहिउ को आयएफएफके के स्पिरिट ऑफ सिनेमा अवॉर्डनं सन्मानित करण्यात आले. संपूर्ण आठवडा सुरु असणाऱ्या या कार्यक्रमात 81 देशांचे 175 चित्रपट दाखवण्यात आले.
हेही वाचा : Animal : बॉबी देओलच्या एन्ट्रीचं गाणं Jamal Jamalo Kudu चा अर्थ काय तुम्हाला माहितीये?
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच ते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द वॅक्सिन वॉर या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाचं खूप प्रमोशन करण्यात आलं होतं. तरी देखील ते बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाही. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही.