शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

भर पावसात सभा... महाराष्ट्राच्या राजकारणातील लकी फॅक्टर! शरद पवारांप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांची स्ट्रॅटर्जी

भर पावसात सभा... महाराष्ट्राच्या राजकारणातील लकी फॅक्टर! शरद पवारांप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांची स्ट्रॅटर्जी

Sharad Pawar In Rain : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भर पावसात सभा घेणे हा लकी फॅक्टर ठरत आहे. शरद पवार यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी देखील भर पावसात सभा घेतली.  

Nov 15, 2024, 17:00 PM IST
'काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...'

'काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...'

Sharad Pawar on Devendra Fadnavis: राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे

Nov 15, 2024, 16:35 PM IST
84 झालंय अजून 16 बाकी आहेत... शरद पवारांनी  महाराष्ट्र पिंजून काढला आणि वातावरण फिरवलं

84 झालंय अजून 16 बाकी आहेत... शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि वातावरण फिरवलं

Sharad Pawar : शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला की ते त्यावर मिश्कील टोला लगावतात. आपण अजून तरुण असल्याचं शरद पवार वारंवार सांगतात. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी पवारांचा झंझावाती प्रचार सुरू आहे.

Nov 14, 2024, 21:31 PM IST
शरद पवारांनी ‘गद्दार’ म्हटल्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले ‘जर सर्व...’

शरद पवारांनी ‘गद्दार’ म्हटल्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले ‘जर सर्व...’

Dilip Walse Patil on Sharad Pawar: ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते असं म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) मतदारांना दिलीप वळसे पाटलांना (Dilip Walse Patil) पाडण्याचं आवाहन केलं आहे.

Nov 14, 2024, 20:04 PM IST
शरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा, 'हे गद्दार अन्...'

शरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा, 'हे गद्दार अन्...'

Sharad Pawar on Dilip Walse Patil: या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा असं शरद पवारांनी म्हटल आहे. 

Nov 13, 2024, 19:59 PM IST
'आपल्या पायांवर उभे राहा,' सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटकारलं; म्हणाले 'जर तुम्हाला शरद पवारांचे...'

'आपल्या पायांवर उभे राहा,' सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटकारलं; म्हणाले 'जर तुम्हाला शरद पवारांचे...'

Supreme Court NCP: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) शरद पवारांचे (Sharad Pawar) फोटो, व्हिडीओ न वापरण्याची सूचना केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (

Nov 13, 2024, 16:19 PM IST
Nashik Yeola Sharad Pawar Chhagan Bhujbal Meet Narow Missed

पवार- भुजबळांची भेट हुकली

Nashik Yeola Sharad Pawar Chhagan Bhujbal Meet Narow Missed

Nov 13, 2024, 12:45 PM IST
महाराष्ट्रातील 'या' 38 मतदारसंघांमध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत; वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील 'या' 38 मतदारसंघांमध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत; वाचा संपूर्ण यादी

NCP vs NCP: राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यामुळे शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या चौघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. निवडणूक जिंकत

Nov 12, 2024, 21:59 PM IST
'म्हणून शरद पवारांनी मला आणि अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही' छगन भुजबळांनी सर्वच विस्कटून सांगितलं

'म्हणून शरद पवारांनी मला आणि अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही' छगन भुजबळांनी सर्वच विस्कटून सांगितलं

Chhagan Bhujbal On CM Post: शरद पवारांनी आपल्या मुलाखतीतून 2004 साली छगन भुजबळ हे मुख्यमंत्री का झाले नाहीत? याचा किस्सा सांगितला होता. 

Nov 12, 2024, 18:44 PM IST
Sharad_Pawar_Six_Election_Campaign_Rally_For_Nashik_Vidhan_Sabha_Constituency.

नाशिक जिल्ह्यात आज शरद पवारांच्या प्रचाराचा धडाका

Sharad_Pawar_Six_Election_Campaign_Rally_For_Nashik_Vidhan_Sabha_Constituency.

Nov 12, 2024, 12:00 PM IST
मोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

मोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नवनवीन गोष्टींच्या चर्चा पाहायला मिळत असून, त्यात आता पवारांच्या आणखी एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Nov 12, 2024, 08:51 AM IST