शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, 'या' घटनेवर बोलताना म्हणाले की...

शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, 'या' घटनेवर बोलताना म्हणाले की...

Sharad Pawar Call Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि महायुतीच्या खाते वाटपानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच फडणवीस यांना फोन केला. 

Dec 22, 2024, 22:01 PM IST
pawardelhimeet

...म्हणून शरद पवारांनी PM मोदी, उपराष्ट्रपतींना Gift केली डाळिंबं; जाणून घ्या खास कारण

Sharad Pawar Gifts Pomegranates To Modi: शरद पवारांनी दिल्लीत पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींची भेट घेतली.

Dec 18, 2024, 13:29 PM IST
अजित पवार-शरद पवारांमधील कटुता कमी होणार? काका-पुतण्याच्या मनोमिलनाचा नवा अध्याय सुरु?

अजित पवार-शरद पवारांमधील कटुता कमी होणार? काका-पुतण्याच्या मनोमिलनाचा नवा अध्याय सुरु?

शरद पवारांना (Sharad Pawar) वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) नात्यात ऑलवेल असल्याचा संदेश दिला आहे.   

Dec 12, 2024, 21:18 PM IST
Ajit Pawar And Sharad Pawar Meet Healthy Relationship

VIDEO|काका-पुतण्याच्या नात्यात ओलावा?

Ajit Pawar And Sharad Pawar Meet Healthy Relationship

Dec 12, 2024, 21:00 PM IST
अचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'

अचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'

Ajit Pawar Meet Sharad Pawar: शरद पवारांची अजित पवार यांनी दिल्ली येथील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

Dec 12, 2024, 10:42 AM IST
85 व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांचा शरद पवारांना खास मेसेज! म्हणाले, 'आपणांस उत्तम...'

85 व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांचा शरद पवारांना खास मेसेज! म्हणाले, 'आपणांस उत्तम...'

Ajit Pawar Wishes Sharad Pawar On His Birthday: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवारांचा आज वाढदिवस असून राज्याच्या राजकारणात सहा दशकांहून अधिक काळापासून सक्रीय असलेल्या या नेत्याला

Dec 12, 2024, 09:17 AM IST
Birthday Special: दागिने, कोट्यवधींचं घर, Shares मध्ये मोठी गुंतवणूक... शरद पवारांची एकूण संपत्ती...

Birthday Special: दागिने, कोट्यवधींचं घर, Shares मध्ये मोठी गुंतवणूक... शरद पवारांची एकूण संपत्ती...

Sharad Pawar Net Worth 2024 In Rupees: शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस असून मागील सहा दशकांपासून राज्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या पवारांची एकूण संपत्ती कितीये ठाऊक आहे का?

Dec 12, 2024, 07:47 AM IST
मारकडवाडीचा रणसंग्राम, EVM आणि बॅलेट पेपरवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने

मारकडवाडीचा रणसंग्राम, EVM आणि बॅलेट पेपरवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने

मारकडवाडीत ईव्हीएम की बॅलेट पेपरवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 09, 2024, 20:31 PM IST