नवीन सर्वे जाहीर, मोदी सरकारवर जनतेचा विश्वास कायम

दावोसमध्ये ग्लोबल ट्रस्ट इंडेक्सच्या वार्षिक अहवालात भारताने पुन्हा तिसरा क्रमांक पटकावला आहे. लगातार दुसऱ्या वर्षी भारत टॉप 3 मध्ये आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 29, 2018, 12:43 PM IST
नवीन सर्वे जाहीर, मोदी सरकारवर जनतेचा विश्वास कायम title=

दावोस : दावोसमध्ये ग्लोबल ट्रस्ट इंडेक्सच्या वार्षिक अहवालात भारताने पुन्हा तिसरा क्रमांक पटकावला आहे. लगातार दुसऱ्या वर्षी भारत टॉप 3 मध्ये आहे.

भारताची घसरण

ज्या देशांच्या सरकारवर जनता सर्वाधिक विश्वास ठेवते अशा देशांची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. भारत या यादीत मागच्या वर्षीच्या तुलनेत क्रमवारीत खाली आला आहे. मागच्या वर्षी भारत या यादीत पहिल्या स्थानावर होता. यावर्षी मात्र भारत तिसऱ्या स्थानावर आला आहे.

पहिल्या स्थानावर कोण?

या रँकिंगमध्ये चीनने मोठी उडी घेतली आहे. तर अमेरिकेला सर्वात मोठं नुकसान झालं आहे. रँकिंगनुसार चीनचे 2017 मध्ये 67 पॉइंट्स होते. चीन मागच्या वर्षी तिसऱ्या स्थानावर होता. 2018 मध्ये  7 पॉइंट्सच्या वाढसह 74 पॉईंटने तो टॉपवर आहे.

सरकारपुढे आव्हान

भारत मागच्या वर्षी 72 पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर होता. या वर्षी 4 पॉइंट्स कमी झाले आहेत. जीएसटी आणि नोटबंदीनंतर लोकांमध्ये थोडीफार नाराजी होती. मोदी सरकारमध्ये मात्र हा उत्साह भरण्यासाठी काम करेल. सरकारशिवाय बिझनेस वर्ग, मीडिया आणि एनजीओ याकडे कशा प्रकारे बघते याबाबतीत ही भारत विश्वासपात्र गटात येतो. 4 पॉईंटसने भारत तिसऱ्या स्थानावर असला तरी मोदी सरकारवर अजूनही सरकारचा विश्वास काय असल्याचं दिसतंय.