पतीचे कृत्य: माजी पत्नीचे केले तुकडे करून मांस शिजवून खाल्ले

एका क्रूर पतीने आपल्या पहिल्या पत्नीच्या शरीराचे तुकडे केरून, त्या मांसाचे तुकडे शिजवून खाल्ले. क्रूर पती इतक्यावरच थांबला नाही. त्याने मांसाचे उरलेले तुकडे आणि स्टोव्ह एका प्लास्टीकच्या पिशवीत लपवून ठेवले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 28, 2018, 10:54 PM IST
 पतीचे कृत्य: माजी पत्नीचे केले तुकडे करून मांस शिजवून खाल्ले title=

मेक्सीको : एका पतीच्या क्रुरतेने कळस गाठल्याची धक्कादायक बातमी मेक्सिको येथे घडली आहे. एका क्रूर पतीने आपल्या पहिल्या पत्नीच्या शरीराचे तुकडे केरून, त्या मांसाचे तुकडे शिजवून खाल्ले. क्रूर पती इतक्यावरच थांबला नाही. त्याने मांसाचे उरलेले तुकडे आणि स्टोव्ह एका प्लास्टीकच्या पिशवीत लपवून ठेवले.

कुटुंबियांना बसला धक्का

दुसऱ्या बाजूला पीडित महिला अचानक गायब झाल्यामुळे हैराण झाले होते. दरम्यान, २२ जानेवारीला पीडितेच्या माजी पतीच्या घरी स्टोव्हर ठेवलेल्या भांड्यात तिच्या शरीराचे काही अवशेष आणि तुकडे मिळाले. माग्दालेना अगिलार रोमेरो असे या महिलेचे नाव असून, ती २८ वर्षांची होती. तिची ही अवस्था पाहून तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला.

आरोपी पीडितेचा माजी पती

घटना मेक्सिकोच्या दक्षिण भागातली आहे. येथील गेरेरो राज्यातील टेक्सको येथे माग्दालेना आपल्या कुटुंबियांसोबत राहात होती. तिला दोन मुलेही होती. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माग्दालेनाचा माजी पती सीजर लोपेज आर्सिनीगा हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याने माग्दालेनाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि ती पिशवी फ्रिजमध्ये लपवून ठेवली. राज्यातील सुरक्षा विभागाचे प्रवक्ते रॉबर्टो अल्वारेज यांनी म्हटले आहे की, मृतदेहाची अवस्था आणि मांसाचे तुकडे पाहता ते मांस शिजवले असण्याचे दिसून येते.

पोलिसांनी तपास सुरू केला

रोमेरो माग्दालेना हिला १३ जानेवारी या दिवशी शेवटचे जींवत पाहिले होते. प्राप्त माहितीनुसार तिला जीवंत पाहिले तेव्हा ती, टेक्सासो येथील आपल्या घरी निघाली होती. त्या दिवशी दुपारी ती आपल्या माजी पतीपासून मुलांना घेण्यासाठी गेली होती. मात्र, त्यानंतर ती ना परत आली ना कोणाला दिसली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, तिच्या माजी पतीने तिची हत्या का केली याची माहिती पुढे येऊ शकली नाही.

महिलांविरोधातील गुन्ह्यांत वाढ

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोमेरो माग्दालेना हिच्या हत्येची चौकशी सुरू आहे. दरम्यान, मेक्सिको सरकार आणि संयुक्त राष्ट्र महिला एजन्सीने दिलेल्या अहवालातील अकडेवारीनुसार गेल्या काही महिन्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांत वाढ झाली आहे.