'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल

Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.   

सायली पाटील | Updated: Jan 20, 2025, 10:00 AM IST
'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल title=
ubt shivsena saamana editorial on mahayutis declaration of guardian ministers list

Beed Gaurduian Minister : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बऱ्याच दिवसांच्या सत्तानाट्यानंतर राज्यात महायुतीची सत्तास्थापना झाली. त्याचप्रमाणं अखेर राज्यात विविध जिल्ह्यांच्या नावे पालकमंत्र्यांची नियुक्तीही करण्यात आली. असं असतानाच या मंदगती कारभारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सडकून टीका करण्यात आली आहे. 

इथं पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झालेली असतानाच या पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देत राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची निवड रद्द करम्यात आल्यानं आता नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद पाहायला मिळत आहे. हीच वस्तूस्थिती पाहत ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'च्या अग्रलेखातून टीकेचा सूर आळवण्यात आला आहे. 

प्रत्यक्षात प्रशासकीय व्यवस्थेत पाकमंत्रीपद अशा कोणत्याही पदाचा उल्लेख नसून, ती एक राजकीय सोय असली तरीही त्यासाठीसुद्धा सत्ताधारी महायुतीला इतका वेळ दवडायला लागणं या गोष्टीकडे अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आलं. काही मंडळींना आपल्या आवडीला जिल्हा न मिळ्याल्यानं त्यांची नाराजी, तर काहींना या यादीतूनच डावलण्यात आल्यानं त्यांची आदळआपट निश्चित असल्याचं अग्रलेखातून म्हटलं गेलं. 

पडद्यामागचे पालकमंत्री? 

बीडमध्ये सध्या असणारं तणावाचं वातावरण, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण या एकंदर परिस्थितीचा आढावा घेत इथं पालकमंत्रीपदाची धुरा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपवण्याता आली. परिणामी पुणे आणि बीड अशा दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याचं स्पष्ट झालं. पण, प्रत्यक्षात जनमतामुळं घेण्यात आलेला हा निर्णय पडद्यामागचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्याच पारड्यात पडू नये अशी अपेक्षा अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : 'मी बीडची मुलगी असल्याने...'; जालन्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेल्या दाव्यानुसार ज्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद होतं तेव्हा या पदाची सूत्र वाल्मिक कराडच्या हाती असल्याचं बोललं गेलं. परिणामी आताही बीडसाठी काढलेल्या या मार्गाबाबत हीच परिस्थिती उदभवत  'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा', असं झाल्यास सत्ताधाऱ्यांना जनता उत्तर देईल असा थेट इशारा सामनातून देण्यात आला.