Video : बांगलादेशी प्रेक्षकांकडून हिंदू क्रिकेटरचा अपमान, Live मॅचमध्ये जे घडलं ते पाहून संताप होईल

Litton Das Video: बांगलादेशच्या एकमेव हिंदू क्रिकेटपटूविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 20, 2025, 10:42 AM IST
Video : बांगलादेशी प्रेक्षकांकडून हिंदू क्रिकेटरचा अपमान, Live मॅचमध्ये जे घडलं ते पाहून संताप होईल title=

Bangladeshi Spectators Insulted Litton Das: एका सामान्य दरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचे बघायला मिळाले. बांगलादेशचा प्रसिद्ध विकेटकीपर-फलंदाज लिटन दासला त्याच्याच देशात अत्यंत वाईट पद्धतीने अपमानाला सामोरे जावे लागले आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (BPL) चितगावमध्ये त्याला क्रिकेट चाहत्यांनी केलेल्या अवनमाचा सामना करावा लागला. ढाका कॅपिटल्स विरुद्ध फॉर्च्यून बरीशाल सामन्यादरम्यान ही घटना घडली. या घटनेने अन्य क्रिकेटर्सला आणि चाहत्यांना धक्का बसला. बांगलादेशच्या एकमेव हिंदू क्रिकेटपटूविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे  यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 

लिटन दास कोणत्या टीमकडून खेळतो? 

लिटन दास बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ढाका कॅपिटल्सकडून खेळतो. श्रीलंकेचा थिसारा परेरा या संघाचा कर्णधार आहे. अनुभवी गोलंदाज मुस्तफिजुर रहमान हा या संघातील एक महत्त्वाचा सदस्य आहे. 

हे ही वाचा: 'या' खेळाडूचा रेकॉर्ड ऋषभ पंतपेक्षाही बेस्ट, पण तरीही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात जागा नाही

 

नक्की काय झाले? 

लिटन दास सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षक त्याच्याकडे बोट दाखवू लागले. फक्त बोटच दाखवले नाही तर ते आरडाओरडाही करू लागले.   त्यावेळी लिटन काहीच बोलला नाही, शांत उभा राहून अपमान करणाऱ्या त्या प्रेक्षकांकडे बघतच राहिला. या घटनेचा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला.

लिटनला काय बोलले प्रेक्षक?

काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या घटनेचा संबंध बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांशी जोडला. ढाका कॅपिटल्स विरुद्ध फॉर्च्यून बरीशाल सामन्यादरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. लिटनला बंगालीमध्ये 'भुआ' असे चिडवले जात होते. भुआ  याचा अर्थ कचरा असा आहे.

हे ही वाचा: "बायकांना काही कळत नाही...".युवराज सिंगचे वडिलांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

 

लिटनला संघाची लाभली साथ 

चांगली गोष्ट म्हणजे लिटनचा संघ ढाका कॅपिटल्सकडून त्याला साथ लाभली. या टीमने आपल्या खेळाडूच्या समर्थनार्थ आवाज उठवला. ढाका कॅपिटल्सने त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्टमध्ये लिहिले, “तुम्ही कोणाचा तरी अवमान करत असल्याचा अस्पष्ट व्हिडीओ पाहू शकता. आम्ही BPL इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावणारा राष्ट्रीय नायक पाहतो. तुम्ही टीका पाहता आणि आम्ही एक स्टार फलंदाज पाहतो ज्याच्याकडे बांगलादेशची सर्वोच्च वैयक्तिक एकदिवसीय धावसंख्या आणि देशाची सर्वोत्तम कसोटी फलंदाजी रँक आहे. तुम्हाला अडथळे दिसतात आणि आम्हाला इतिहास घडताना दिसतो. लिटन, तू आमच्या प्रेमाचे प्रतीक आहेस. तू आमचा अभिमान आहात." 

हे ही वाचा: स्तुती की छळ? महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या तरुणीसोबत रील्स काढण्यासाठी जमली गर्दी, Video Viral

 

लिटन दास काय म्हणाला?

ढाका कॅपिटल्सच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, लिटन दास म्हणाला, “माझ्या संघाच्या, ढाका कॅपिटल्सच्या वतीने केलेले हे जेश्चर पाहून मला खूप आनंद झाला. सर्व उच्च आणि निम्न स्तरातून पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. तुमचा विश्वास माझ्यासाठी जग आहे.''  चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी लिटन दासची बांगलादेश संघात निवड झालेली नाही.