प्रेम जुळलं, लग्न झालं, दोन मुलंही झाली! पण सहा वर्षाने कळलं आपली पत्नी तर...

Man Married to His Sister: लग्न (Marriage) म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक नवी सुरुवात असते. एका अनोळखी व्यक्तीसोबत आपण पुढील अनेक वर्षं सोबत राहण्याच्या शपथा यावेळी घेत असतो. पण एका व्यक्तीला लग्नाच्या सहा वर्षांनी आपली पत्नी (Wife) आपली बहीण (Sister) असल्याचं समजल्यानंतर धक्का बसला आहे.   

Updated: Mar 16, 2023, 04:18 PM IST
प्रेम जुळलं, लग्न झालं, दोन मुलंही झाली! पण सहा वर्षाने कळलं आपली पत्नी तर... title=

Man Married to His Sister: लग्न (Marriage) म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. लग्नानंतर एक अनोळखी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि एका नव्या इनिंगची सुरुवात होती. लग्नासाठी प्रत्येक धर्म, देशात वेगवेगळे नियम आहेत. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करु नये अशी अट काही ठिकाणी असते. पण एक नियम मात्र शक्यतो सर्वच ठिकाणी पाळला जातो तो म्हणजे आपल्या रक्ताच्या नात्याशी व्यक्तीसोबत लग्न करु नये. यामागे वैज्ञानिक कारणंही आहेत. 

जर तुम्ही आपल्याच रक्ताच्या नातेवाईकाशी लग्न केलं तर जन्माला येणारं मूल सुदृढ नसण्याती शक्यता असते. यामुळेच आपली बहीण, भाऊ यांच्याशी लग्न केलं जात नाही. पण जर लग्नाच्या काही वर्षांनी तुम्हाला आपण जिच्यासोबत संसार करत आहोत ती पत्नी नसून आपली बहीण आहे असं समजलं तर काय होईल. फार मोठा धक्का बसेल ना....एका व्यक्तीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. लग्नाच्या सहा वर्षांनी त्याला जिच्यासोबत आपण संसार थाटला आहे ती आपली बहीण असल्याचं समजलं आणि पायाखालची जमीनच सरकली.

सख्ख्या बहिणीशी केलं लग्न

तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संपूर्ण घटनाक्रम सांगितलं आहे. झालं असं की, तरुणाचा जन्म झाल्यानंतर त्याला एका कुटुंबाने दत्तक घेतलं होतं. त्यामुळे त्याला आपल्या खऱ्या आई-वडिलांबद्दल फार माहिती नव्हतं. मोठा झाल्यानंतर त्याला त्याच्या शहरातील एक मुलगी आवडू लागली. त्या दोघाचं सूत जुळलं आणि २ वर्षांनी त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांना दोन मुलंही झाली. 

लग्नानंतर पत्नी सतत आजारी पडत होती. यामुळे तरुणाने तिला तपासणीसाठी डॉक्टरकडे नेलं असता त्याला ही आपली सख्खी बहीण असल्याचं समजलं. 

सत्य कसं समोर आलं?

पत्नीची किडनी निकामी झाली असल्याने ट्रान्सप्लांट करण्याची गरज होती. कुटुंबाने किडनी मिळवण्यासाठी प्रयत्न केला. पण कोणीही डोनेशनसाठी तयार होत नव्हतं. पण जेव्हा पतीने चाचणी केली तर त्याची किडनी फक्त मॅच झाली नाही तर तिचा पॉझिटिव्हिटी रेट इतका होता की डॉक्टरही चक्रावले.

डॉक्टरांनी तरुणाला सांगितलं की, खासकरुन आई-वडील आणि मुलांचा मॅच रेट 50 टक्के असतो. पण बहिण आणि भावांचा मॅच रेट 100 टक्के असतो. पती पत्नीमध्ये कधीही असं होत नाही. फक्त भाऊ, बहीण असतानाच मॅच रेट इतका असतो. हे ऐकल्यानंतर तरुणाला धक्काच बसला. कारण त्याचं लग्न होऊन सहा वर्ष झाली असून त्यांना दोन मुलंही आहेत.