Pune News : मंगळवारी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद; भाजीपाला, किराणा मिळणार नाही?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मंगळवारी सर्व बाजार बंद राहतील.   

सायली पाटील | Updated: May 6, 2024, 09:28 AM IST
Pune News : मंगळवारी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद; भाजीपाला, किराणा मिळणार नाही?  title=
Pune news markets to shut down amid loksabha Election 2024 third phase voting

Pune News : (Loksabha Election 2024) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारतोफा आता थंडावल्या आहेत. प्रत्येक पक्षानं अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या हेतून प्रचारसभांचा धुरळा उडवला होता. काहींनी दारोदार जाऊन प्रचारही केला. कार्यकर्त्यांपासून मोठ्य़ा नेत्यांपर्यंत सर्वांचाच यात समावेश पाहायला मिळाला. राज्यात निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या निमित्तानं रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले इथं मतदान पार पडणार आहे. याच धर्तीवर पुणे जिल्ह्यात महत्त्वाचा निर्णय झाला आहे. 

निवडणूक प्रक्रिया लक्षात घेता मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद राहणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं हे निर्देश देण्यात आल्यामुळं आता तिसऱ्य़ा टप्प्यातील मतदानादरम्यान पुणे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. 

हेसुद्धा वाचा : कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुणे, मावळ ,शिरूर लोकसभा मतदारसंघातील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून, गावांमधील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. बाजारपेठा बंद राहणार म्हणजे किराणा, भाजीपाला मिळणार नाही का? असा प्रश्न यामुळं अनेकांना पडला. पण, ही चिंतेची बाब ठरणार नसून, भाजीविक्रेते आणि धान्यदुकानं मात्र ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असतील.