मेळघाटातील शेतकऱ्यांवर 'केसाळ अळी'चे संकट; ऐन पेरणीच्या दिवसात अडचणीत भर

पेरणीला अवघे काही दिवस झाले असतानाच येथील शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे आणि ते संकट आहे केसाळ अळीचे.

Updated: Jul 2, 2021, 12:25 PM IST
मेळघाटातील शेतकऱ्यांवर 'केसाळ अळी'चे संकट; ऐन पेरणीच्या दिवसात अडचणीत भर title=

अनिरुद्ध दवाळे, अमरावती : जिल्ह्यातील मेळघाट भागात शेती कसने म्हणजे जिकरीचं काम होय. कारण हा संपूर्ण भाग पहाडी भाग आहे. त्यात अनेकदा पाऊस जास्त होतो त्यामुळे हमखास उत्पन्नाची हमी देखील नाही त्यामुळे येथील शेतकरी नेहमी विविध संकटात सापडत असतो. पेरणीला अवघे काही दिवस झाले असतानाच येथील शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे आणि ते संकट आहे केसाळ अळीचे.

पिकांवर पडलेल्या 'केसाळ अळी'चे या अळीचा मोठा प्रादुर्भाव असल्याने वर आलेल्या पिकांचे पाने ही अळी कुडतळत आहे. दरम्यान या अळीचा सर्वाधिक प्रभाव हा चिखलदरा तालुक्यातील जंगल परिसरातील गावांमध्ये दिसून आला. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करून शेतात बियाण्याची पेरणी केली त्या शेतात मात्र या अळीचा प्रादुर्भाव नसल्याचा जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच मेळघाटातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतात पेरणी केली मेळघाटामध्ये सर्वाधिक शेतकरी हे मका पिकाची लागवड करतात सध्या मक्याचे पीक हे वर आले आहे. परंतु अशातच चिखलदारा तालुक्‍यातील जंगल भागातील जवळपास अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या केसाळ अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आल्याने पिके धोक्यात आली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा येथील शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सुद्धा मुबलक पाऊस झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 

चांदुर बाजार तालुक्यात शंखुअळीचा प्रादुर्भाव....

गेल्या वर्षी अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात  आलेल्या शंखु अळीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. आणि याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला होता.

मात्र आता यंदाही चांदुर बाजार तालुक्यात शंखु अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांनावर दुपार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

अचलपूर तालुक्यात नागवाणी अळीचा प्रादुर्भाव....

मेळघाटात केसाळ अळीने मेळघाटच्या कहर केल्यानंतर आता मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या अचलपूर तालुक्यात नागवाणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आता या अळीचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले जात आहे.

सध्या पावसाने गेल्या आठ दिवासनांपासून दांडी मारल्याने नागवाणी अळीला खाण्यासाठी जे खाद्य लागले ते उपलब्ध होत नसल्याने ही अळी पिकांवर आक्रमक करत असल्याने कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील सोयाबीनवर खोड माशीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता....

जिल्ह्यात गेल्या वर्षी सोयाबीन वर आलेल्या खोडमाशीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उभे असलेले पीक कापून टाकण्याची अनेक शेतकऱ्यांवर वेळ आली होती.

मात्र आता पिकांची योग्य काळजी न घेतल्यास पुन्हा या वर्षी सोयाबीनवर खोड माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आधीच पावसाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात असतांना आणखी एक नवं संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकण्याची वेळ आली आहे.

पश्चिम विदर्भात पिके जगवण्यासाठी भर पावसाळ्यात तुषार सिंचनचा वापर

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून विदर्भामध्ये वेळेवर दाखल झाला. दहा तारखेला मान्सून सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने आपल्या शेतात पेरणीही केली. परंतु मागील आठ दिवसांपासून पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे.

त्यामुळे आता पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. परिणामी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाळ्यात तुषार सिंचनाचा वापर करावा लागत आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या पावसाळाला आला तरी उन्हाळ्यासारखे चित्र शेतांमध्ये दिसून येत आहे.

अमरावतीत पावसाअभावी आठ एकर कपाशी पिकावर चालवला शेतकऱ्याने ट्रॅक्टर

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा मानसून विदर्भामध्ये वेळेवर दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसनवार कर्ज घेऊन पैसे आणले आणि आपल्या शेतात घाईगडबडीने पेरणी केली. परंतु पेरणी केल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे.

दर्यापुर तालुक्यातील येवदा परिसरात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस नसल्याने पिके कोमजू लागली आहे तर अनेक ठिकाणी बियाणं पावसाअभावी उगवलच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. 

दर्यापूर तालुक्यातील येवदा गावातील शेतकरी संतोष तिडके यांनी यंदा आठ एकर शेतावर कपाशीची लागवड केली होती.

परंतु लागवडी नंतर पावसाने दडी दिल्याने कंपाशी उगवली नसल्याने हतबल झालेल्या संतोष तिडके यांनी तब्बल आठ एकर कपाशीवर ट्रॅक्टर चालवला आहे त्यामुळे आता त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आल आहे.