मुंबई : अॅप्पल आयफोन 13 प्रो मॅक्स (Apple iPhone 13 Pro Max) घ्यावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र तो आयफोन घेण्याची प्रत्येकाची आर्थिक क्षमता असतेच असं नाही. मात्र काही जण पैसे जमा करुन किंवा हफ्त्यावर (Iphone On Emi) हा आयफोन खरेदी करतात. चक्क फक्त 10 हजार रुपयांमध्ये अॅप्पल आयफोन 13 प्रो मॅक्स मिळतोय. (fact check tech news iphone 13 pro max clones selling 10 thousand rupees )
अॅप्पल आयफोन 13 प्रो मॅक्स खरेदी करण्यासाठी आता शॉर्टकट वापरत आहेत. फेसबुकवर एक ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. ज्यावर तुम्ही बरेच प्रोडक्ट खरेदी करू शकता. या प्रोडक्ट्समध्ये आता आयफोन 13 प्रो मॅक्स चा समावेश करण्यात आला आहे. हा आयफोन इथे परवडणाऱ्या विकला जात आहे. फेसबुक केस मार्केटप्लेसमध्ये प्रत्येक वस्तू मिळते. यामध्ये आयफोन 13 सीरीजचा समावेश झालाय. हा मॉडेल ₹10 हजार रुपयांमध्ये विकला जात आहे. स्वस्तात आयफोन मिळत असल्याने अनेक जण या मार्केटप्लेससह कनेक्ट होत आहेत.
आयफोन 13 प्रो मॅक्स मॉडेलची ऑनलाइन मार्केटप्लेस वर विक्री केली जात आहे, जो क्लोन मॉडेल आहे. क्लोन मॉडेल म्हणजे पूर्णपणे नकली. जर तुम्ही हा फोन खरेदी केलात, तर तुमचे पैसे वाया जातील. हा एक फेक मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये ना धड कॅमेरा चांगला आहे ना डिस्पले. हा मॉडेल फक्त दिसायलाच आयफोनसारखा आहे. त्यामुळे फक्त 10 हजार रुपयात हा स्मार्टफोन विकला जात आहे.