zee24taas

पुणे-सोलापूर महामार्गावर होंडा सिटीनं दुचाकीस्वाराला चिरडलं

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर इथं होंडा सिटी कारनं दुचाकीस्वाराला चिरडलं. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर होंडा सिटी चालकानं पोबारा केला. 

Aug 5, 2015, 12:19 PM IST

ड्रंक अँड ड्राईव्ह: वकील जान्हवी गडकरला 58 दिवसानंतर जामीन

हिट अँड रन प्रकरणातली आरोपी जान्हवी गडकर हिला 58 दिवसांनंतर जामीन मिळालाय. 30 हजारांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झालाय. यापूर्वी दोन वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. 

Aug 5, 2015, 12:06 PM IST

BSFच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद

जम्मू-श्रीनगर हायवेवर उधमपूर जिल्ह्यात सामरोली इथं BSFच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत, तर एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आलंय. सीमा सुरक्षा दलाचे 8 

Aug 5, 2015, 11:42 AM IST

2 जर्मन मुलींचा 'अमर-प्रेम' व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल

बॉलिवूडचे गाणे आणि डॉयलॉगसाठी बनवलं गेलेलं डबस्मॅश अॅप सामान्य नागरिकांसोबत सेलिब्रिटीजमध्येही खूप पॉप्युलर आहे. जर्मनीच्या दोन मुलींचा असाच व्हिडिओ सध्या वायरल झालाय.

Aug 5, 2015, 11:19 AM IST

म्हैसूरच्या FSSAIची मॅगीला क्लिनचिट

सरकारी मान्यताप्राप्त म्हैसूर इथल्या सेंट्रल फूड टेक्नॉजिकल रिसर्च इस्टिट्यूट या प्रयोगशाळेनं नेस्ले इंडिया कंपनीची 'मॅगी' खाण्यास अपायकारक नसल्याचा निर्वाळा दिला आहे. 

Aug 5, 2015, 09:56 AM IST

26/11 हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेला, पाकिस्तानी माजी गुप्तचर प्रमुख

मुंबईवरील '26/11'चा दहशतवादी हल्ला पाकिस्ताननंच केला हे कटू सत्य असून, ते कबूल करा आणि दोषींवर खटला चालवून शिक्षा करा, अशी पोलखोल खुद्द पाकच्याच गुप्तचर विभागाचे माजी महासंचालक तारीक खोसा यांनी केली आहे. या हल्ल्याचे तपास अधिकारी म्हणून काम केलेले खोसा यांनी पाकिस्तानची पोलखोल करत दहशतवादी कसाब हा पाकिस्तानी होता. लष्कर-ए-तोयबानं हल्ल्याचा कट रचला आणि कराचीतून हल्ल्या वेळी सूचना दिल्या, असंही जगजाहीर केलं आहे.

Aug 5, 2015, 09:30 AM IST

व्याघ्र रक्षणासाठी बिग बी, मास्टरब्लास्टर होणार ब्रँड अॅम्बेसेडर

राज्यातील वन्यजीव संवर्धनासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांना राज्य सरकारनं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्यासाठी गळ घातली आहे. दोघांपैकी एकानं जरी तयारी दाखवली तरी त्यांना त्याला राज्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केले जाणार आहे.

Aug 4, 2015, 02:36 PM IST

जाणून घ्या किशोरदांबद्दल या 10 गोष्टी

गायक आणि अभिनेते म्हणून ज्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलं. त्या किशोर कुमार यांचा आज वाढदिवस. किशोरदांनी अभिनेता, गायक, स्क्रिप्ट रायटर, कंपोझर, निर्माता, दिग्दर्शक यासर्व आघाड्यांवर आपली छाप पाडली. 

Aug 4, 2015, 01:08 PM IST

"या देशात मुलगी म्हणून कुणीही जन्माला येऊ नये"

लैंगिंक अत्याचाराची शिकार ठरलेली आयएएस ऑफिसर रिजू बाफना यांनी फेसबुकवर आपली आपबिती पोस्ट केलीय. रिजू यांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाच्या सुनावणीवरील कायदेशीर कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. रिजू सध्या मध्य प्रदेशच्या सिवनीमध्ये कार्यरत आहे. 

Aug 4, 2015, 12:23 PM IST