म्हैसूरच्या FSSAIची मॅगीला क्लिनचिट

सरकारी मान्यताप्राप्त म्हैसूर इथल्या सेंट्रल फूड टेक्नॉजिकल रिसर्च इस्टिट्यूट या प्रयोगशाळेनं नेस्ले इंडिया कंपनीची 'मॅगी' खाण्यास अपायकारक नसल्याचा निर्वाळा दिला आहे. 

Updated: Aug 5, 2015, 09:56 AM IST
म्हैसूरच्या FSSAIची मॅगीला क्लिनचिट title=

नवी दिल्ली: सरकारी मान्यताप्राप्त म्हैसूर इथल्या सेंट्रल फूड टेक्नॉजिकल रिसर्च इस्टिट्यूट या प्रयोगशाळेनं नेस्ले इंडिया कंपनीची 'मॅगी' खाण्यास अपायकारक नसल्याचा निर्वाळा दिला आहे. 

गोवा सरकारनं जून महिन्यात या संस्थेकडे तपासणीसाठी पाठविलेली 'मॅगी'ची सॅम्पल्स अन्न सुरक्षा आणि मानक नियम 2011च्या निकषानुसार असल्याचं स्पष्ट केलं आहे. गोवा अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक सलीम व्ही. वेलजी यांनी ही माहिती दिली. 

अनेक राज्यांमध्ये जूनमध्ये मॅगीवर बंदी घातली, ज्यामुळं नेस्ले कंपनीनं बाजारातून मॅगी वापस बोलावली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.