भोपाळ : लैंगिक अत्याचार प्रकरणी एका आयएएस ऑफिसर महिलेला अतिशय वाईट अनुभव आलाय, यावर आयएएस ऑफिसर रिजू बाफना यांनी लिहलंय, "या देशात मुलगी म्हणून कुणीही जन्माला येऊ नये."
लैंगिक अत्याचाराचा जबाब एक भीतीदायक अनुभव
मॅजिस्ट्रेट समोर जेव्हा रिजू बाफना आपल्यावरील झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी जबाब नोंदवायला गेल्या, तेव्हा त्यांनी हा जबाब कॅमेरा बंद नोंदवावा, सर्वांसमोर नोंदवू नये, अशी विनंती केली.
रिजू बाफनांवर वकिल खेकसला आणि म्हणाला...
या विषयी लिहितांना रिजू बाफना म्हणतात, एक वकील माझ्यावर भडकले आणि म्हणाले, "आपण अधिकारी आपल्या ऑफिसमध्ये असाल, मात्र हे कोर्ट आहे", या शब्दात वकीलांनी अपमान केला.
"या देशात मुलगी म्हणून कुणीही जन्माला येऊ नये"
रिजू बाफना म्हणाल्या, मी एवढ्या लोकांसमोर कसं सांगू, लैंगिक अत्याचार कसा झाला?, "मला आता कळलं लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवायला महिला का घाबरतात", "मी प्रार्थना करते, या देशात मुलगी म्हणून कुणीही जन्माला येऊ नये."
न्यायमूतींनाही केली विनंती
बाफना म्हणाल्या, आपल्या जबाबाविषयी त्यांनी न्यायाधिशांनाही सांगितलं. जेव्हा कोणत्या महिलेचा जबाब नोंदवला जातो, तेव्हा तिथं बाकी लोक उपस्थित असू नये. आयएएस महिला ऑफिसर रिजू बाफना सध्या मध्य प्रदेशातील सिवनीमध्ये कार्यरत आहेत.
अधिकाऱ्यालाही मांडावं लागलं सोशल नेटवर्किंगवर मत
तरुण आयएएस अधिकारी रिजू यांनी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर एक पोस्ट टाकलीय, ती खूप वायरल झालीय. अवघ्या ४८ तासांमध्ये हजारोंनी पोस्ट शेअर केलीय.
'अश्लील मेसेज' पाठवण्यासंदर्भात मध्य प्रदेश सरकारच्या मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्याविरोधात, मागील आठवड्यात रिजू बाफना यांनी तक्रार केली होती. रिजू यांच्यानुसार, त्यांनी तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्याला लगेच पदावरून निलंबित करण्यात आलं. पण समाधानकारक कारवाई झाली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.