zee24taas

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे.

Aug 2, 2015, 02:49 PM IST

'एक्स्प्रेस वे'ची वाहतूक अद्याप विस्कळीत, चंद्रकांत पाटील, शिंदेंनी केली पाहणी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. खंडाळा बोगदा परिसरात मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. पर्याय म्हणून हलक्या वाहनांची वाहतूक लोणावळा ते अमृतांजन पूल दस्तूरी या भागात जुन्या महामार्गानं वळवली आहे. 

Aug 2, 2015, 01:31 PM IST

एक उड्डाण असंही... दोघांचा जीव वाचविण्यासाठी सुखोईचा प्रवास

भारतीय लष्कराचं देशवासियांच्या मनातलं स्थान हे नेहमीच वरचं राहिलंय. जवानांचा त्याग, देशसेवेची त्यांची निष्ठा याचं आदरयुक्त कौतूक भारतीयांना आहे... शत्रूची कधीच गय न करणारे जवान अडचणीच्या प्रसंगीही धावून जातात... वायूदलाच्या एका छोट्याशा कृतीनं हेच पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.

Aug 2, 2015, 11:53 AM IST

थरारक व्हिडिओ: १६४ जिगरबाज स्काय डायव्हर्सचा विक्रम!

स्काय डायव्हिंग एक थरारक अनुभव असतो. पण खाली डोके आणि वर पाय अशा परिस्थितीत २४० किमी वेगानं पृथ्वीकडे येतांना १९,७०० मीटर उंचीवर फुलासारखी आकृती तयार करण्याचं दमदार कर्तब १६४ स्काय डायव्हर्सनी केलाय. 

Aug 2, 2015, 10:30 AM IST

टेनिस स्टार सानियाची ‘खेलरत्न’साठी शिफारस

विम्बल्डन टेनिसच्या महिला दुहेरी गटाचं जेतेपद पटकावून इतिहास रचणार्‍या भारताच्या सानिया मिर्झाची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्यावतीनं ही शिफारस करण्यात आली असून आता या विषयीचा अंतिम निर्णय पुरस्कार समितीनं घ्यायचा आहे.

Aug 2, 2015, 09:37 AM IST

गुजरात, राजस्थानसह चार राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार, ११० ठार

गुजरात आणि राजस्थानसह देशातील चार राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळं अनेक राज्यांतील काही शहरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं हाहाकार उडाला आहे. 

Aug 2, 2015, 09:20 AM IST

'इसिस'शी लढण्यासाठी देशातील अंतर्गत सुरक्षा कायम ठेवणार सरकार

अमेरिकतून आलेल्या रिपोर्टनंतर भारतासमोर इसिसचं संकट किती गंभीर आहे, याची दखल आता सरकारनं घेतलेली आहे.

Aug 2, 2015, 09:01 AM IST

अबरामनं केली पापा शाहरूखची सिग्नेचर पोज कॉपी, फोटो वायरल

मोठ्या पडद्यावर आपले दोन्ही हात पसरवून किंग खाननं एक रोमांसची सिग्नेचर पोज दिली. शाहरूखची पोज म्हणून आपण सगळेच ती ओळखतो. शाहरूखचा प्रत्येक फॅन त्याची कॉपी करतो. मात्र नुकतीच या पोजची कॉपी केलीय शाहरूखच्या लाडक्या अबरामने...

Aug 2, 2015, 08:50 AM IST

भारतीय 'रुपयां'वर आता दिसणार डॉ. एपीजे अब्दुल कलाम?

'सामान्यांचे राष्ट्रपती' भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. डॉ. कलाम यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक मागणी जोर धरू लागलीय. ती म्हणजे 'मिसाईल मॅन' कलामांचा फोटो भारतीय चलनावर असावा.

Aug 2, 2015, 08:20 AM IST

झी स्पेशल : साद घालती हिमशिखरे

साद घालती हिमशिखरे 

Aug 1, 2015, 10:42 AM IST

'प्रशांत भूषण यांना चपलेनं मारेन' गायक अभिजीतचं वादग्रस्त ट्विट

 गायक अभिजीतनं पुन्हा वादग्रस्त ट्विट केलंय. आज मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलं. पण जेव्हा बुधवारी मध्यरात्री त्याच्या फाशीच्या स्थगितीसाठी प्रयत्न सुरू होते. त्या प्रकरणावर अभिजीतनं वादग्रस्त ट्विट केलं.

Jul 30, 2015, 10:09 PM IST