जाणून घ्या किशोरदांबद्दल या 10 गोष्टी

गायक आणि अभिनेते म्हणून ज्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलं. त्या किशोर कुमार यांचा आज वाढदिवस. किशोरदांनी अभिनेता, गायक, स्क्रिप्ट रायटर, कंपोझर, निर्माता, दिग्दर्शक यासर्व आघाड्यांवर आपली छाप पाडली. 

Updated: Aug 4, 2015, 01:23 PM IST
जाणून घ्या किशोरदांबद्दल या 10 गोष्टी title=

मुंबई: गायक आणि अभिनेते म्हणून ज्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलं. त्या किशोर कुमार यांचा आज वाढदिवस. किशोरदांनी अभिनेता, गायक, स्क्रिप्ट रायटर, कंपोझर, निर्माता, दिग्दर्शक यासर्व आघाड्यांवर आपली छाप पाडली. 

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या तब्बल 91 चित्रपटांना आवाज देणाऱ्या किशोर कुमार यांच्याबद्दल या खास 10 गोष्टी...

1. किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 ला मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात झाला.

2. किशोर कुमार यांचं खरं नाव 'आभास कुमार गांगुली' होतं.

3. किशोर कुमार प्रसिद्ध अभिनेता अशोक कुमार आणि अनूप कुमार यांचे छोटे भाऊ होते.

4. किशोर कुमार यांनी 70 आणि 80च्या दशकात अमिताभ बच्चन यांच्यासाठी अनेक गाणे गायिली. मात्र 80च्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन यांनी किशोर कुमार यांनी प्रोड्यूस केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला, तेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासाठी गाणं किशोर कुमार यांनी सोडून दिलं.

5. किशोर कुमार लीड सिंगर व्हायच्या आधी 'बॉम्बे टॉकीज'साठी कोरसमध्ये गायचे.

6. किशोर कुमार यांची 'यूडलिंग' खूप प्रसिद्ध होती. ज्याची प्रेरणा त्यांनी भाऊ अनूप कुमार यांच्या ऑस्ट्रियन रिकॉर्ड्सकडून घेतली होती.

7. किशोर कुमार यांनी आपले दोन्ही भाऊ अशोक कुमार आणि अनुप कुमार यांच्यासोबत 1958मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'चलती का नाम गाडी'मध्ये काम केलं होतं.

8. किशोर कुमार यांनी 1985तील चित्रपट 'जमाना'मध्ये दोन्ही लीड अॅक्टर्स राजेश खन्ना आणि ऋषी कपूर यांच्यासाठी सोलो गाणी गायली. जेव्हा प्रश्न ड्युअट गाण्याचा आला तेव्हा किशोर कुमार यांनी फक्त राजेश खन्नाला आवाज दिला, त्यामुळं ऋषी कपूरला शैलेंद्र सिंह आणि मोहम्मद अजीज यांनी आवाज दिला. 

9. सामान्यत: लोकं आपल्या घराच्या गेटवर 'कुत्र्यापासून सावधान' असा बोर्ड लावलेला असतो. मात्र किशोर कुमार यांनी आपल्या मुंबईच्या वार्डन रोडवरील घराच्या गेटवर 'किशोर से सावधान' असा बोर्ड लावला होता. एकदा निर्माते एच.एस.रवैल किशोर कुमार यांच्या घरी त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत करण्यासाठी गेले. तेव्हा किशोरदांनी त्यांच्याकडून पैसे घेतले आणि हातमिळविण्यासाठी रवैल यांनी हात पुढे करताच, त्याचा चावा घेतला आणि आपण घराबाहेरील बोर्ड वाचला की नाही, असा प्रश्न विचारला.
 
10. किशोर कुमार 1970 ते 1987 दरम्यान सर्वात महागडे गायक होते. किशोर कुमार यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, जितेंद्र सारख्या मोठ-मोठ्या दिग्गज कलाकारांसाठी आवाज दिला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.