मुंबई: हिट अँड रन प्रकरणातली आरोपी जान्हवी गडकर हिला 58 दिवसांनंतर जामीन मिळालाय. 30 हजारांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झालाय. यापूर्वी दोन वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
आठ जूनच्या रात्री भरधाव वेगातल्या जान्हवी गडकरच्या गाडीनं इस्टर्न फ्रीवेवर, एका टॅक्सीला जोरदार धडक दिली होती. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी जान्हवी मद्यधुंद अवस्थेत होती. तसंच अपघातानंतर घेतलेल्या वैद्यकीय चाचणीत, जान्हवीच्या रक्तात प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोल आढळून आलं होतं.
गडकर हिला जामीन दिल्यास त्याचा खटल्यावर विपरित परिणाम होईल. साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. अमित देसाई यांनी गडकर हिची बाजू मांडताना ती साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही, तसंच फरारही होणार नाही, असं न्यायालयात सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.