विदर्भात भाजपचाच 'गड', फडणवीस होणार मुख्यमंत्री?
विदर्भ भाजपसाठी 'गड' ठरलाय. विधानसभेच्या ६२ जागांपैकी तब्बल ४३ जागा भाजपनं जिंकल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून ४८०४६ मतांनी विजय मिळवलाय.
Oct 19, 2014, 04:38 PM ISTUPDATE - विदर्भ विभाग निकाल
दिवाळीपूर्वीच नागपूरसह संपूर्ण विदर्भात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. मतमोजणीला सुरूवात झालीय.
Oct 19, 2014, 06:57 AM ISTमुंबईसह कोकण, विदर्भ, गोव्यात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत आज पहाटेपासून पावसानं उसंत घेतलीये. दरम्यान पुढच्या २४ तासांत मुंबईसह कोकण, विदर्भ आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा पुणे वेध शाळेनं वर्तवलाय.
Aug 1, 2014, 09:51 AM ISTभुजबळांचे निकटवर्तीय किशोर कन्हेरे शिवसेनेत
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगत असताना त्यांच्या समता परिषदेच्या नेत्यांनी मात्र शिवसेनेची वाट धरलीय. भुजबळांचे निकटवर्तीय आणि विदर्भातले समता परिषदेचे नेते किशोर कन्हेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.
Jul 14, 2014, 01:11 PM ISTगडचिरोलीत माओवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद
उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा गावचा रहिवासी उमेश पांडुरंग जावळे (31) हा जवान गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती जंगलामध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झाला. पांडुरंग जावळे यांचा तो एकुलता अविवाहीत मुलगा होता.
Jun 27, 2014, 04:01 PM ISTमतदानापूर्वीचा विदर्भ: पैशांची लूट आणि दारूचा पूर
निवडणुकांमध्ये चालणारे काळे व्यवहार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. काळ्या पैशांच्या वापरापासून ते अवैधरित्या दारूचा पुरवठ्यापर्यंत किंवा वस्तुंच्या बदल्यात आपलं बहुमूल्य मत विकत घेण्यापर्यंत अनेक प्रकार घडत असतात... हा प्रकार थांबवायचा असेल, तर आपल्यालाच संयम बाळगणं आणि सावध राहणं आवश्यक आहे.
Apr 9, 2014, 08:26 PM ISTनागपूर, विदर्भात दहा जागांसाठी 201 उमेदवार रिंगणात
निवडणुकीसाठी संपूर्ण विदर्भ सज्ज झालाय. 10 लोकसभा मतदारसंघात एकूण 201 उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 33 तर अकोला मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे सात उमेदवार आहेत. मतदानाच्या निमित्ताने सर्वच मतदारसंघात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Apr 9, 2014, 07:58 PM ISTमनसे प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याला, उद्धव यांची विदर्भात सुरुवात
मनसेच्या प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुटण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराला पुण्यातून तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विदर्भातून सुरुवात करणार आहेत.
Mar 21, 2014, 08:27 PM ISTगारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ, मोदी विदर्भ दौऱ्यावर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २० मार्चला विदर्भाच्या दौ-यावर जाणार आहे. मोदी वर्ध्यात पांढरकवडा इथं चाय पे चर्चा हा कार्यक्रम होणार आहे. लोकसभा निवडणुकीत गुंतलेल्या नेत्यांना आता कुठे खडबडून जाग आलीये. आता सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचार सभा रद्द केल्या आणि सुरू झाली गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ.
Mar 11, 2014, 08:27 PM ISTवेगळ्या विदर्भाची मागणी नव्हे… ही तर स्टंटबाजी!
विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यासंबंधी झालेल्या ‘नागपूर करारा’ला आज ६० वर्षे पूर्ण झाली. वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज या कराराची होळी केली.
Sep 28, 2013, 05:20 PM ISTविदर्भवासियांची सरकारदरबारी पुन्हा थट्टाच!
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या विदर्भवासियांची सरकारनं पुन्हा एकदा थट्टा सुरू केली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या पीडितांना मदत देण्याचं सोडून, सरकारनं नुकसाग्रस्तांचा आढावा घेण्यासाठी पथक पाठवलंय. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याची कबुली दिलीय.
Sep 12, 2013, 09:35 PM ISTविदर्भात ओला दुष्काळ, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
विदर्भातल्या अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर मदत जाहीर केलीय. अतिवृष्टीवरील चर्चेला उत्तर देताना मदत जाहीर केलीय. यंदा विदर्भात पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातलाय.
Aug 1, 2013, 05:53 PM ISTसचिन तेंडुलकर देणार विदर्भाला वीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाच्या पीजवरून थेट राजकीय मैदानात उतरला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कशाला राजकारणात जातोय, सचिन! अशा प्रतिक्रिया आल्यात. मात्र, सचिनने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काम करायचे ठरविले आहे. त्यासाठी सुरूवातीला ज्या गावात वीज नाही तेथे विजेची सुविधा देण्याचा संकल्प सोडला आहे.
Apr 24, 2013, 03:40 PM ISTविदर्भात थंडी, शेतकरी आनंदी
गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पारा दहा अंशाचा खाली घसरल्यानं ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. त्यामुळं थंडीतही शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आहे.
Dec 30, 2012, 09:18 PM ISTचंद्रपूर साहित्यनगरीत 'माय मराठी'चा जयघोष
डोईवर ग्रंथ घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील तरुणी, शिस्तबद्ध लेझीमपथक, मोरपंखांची टोपी घातलेला वासुदेव, अंगावर फटके मारणारा मरीआईचा भोप्या, अश्वारूढ मावळे, सजावट केलेले उंट, वाद्यवृंद पथकासह राष्ट्रसंतांच्या भजनांच्या सुरांनी नटलेल्या ग्रंथदिंडीने केलेल्या ‘माय मराठी'च्या जयघोषात अवघी चंद्रपूरनगरी दुमदुमून गेली. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभामंडपात न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
Feb 4, 2012, 09:04 AM IST