वेगळ्या विदर्भाची मागणी नव्हे… ही तर स्टंटबाजी!

विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यासंबंधी झालेल्या ‘नागपूर करारा’ला आज ६० वर्षे पूर्ण झाली. वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज या कराराची होळी केली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 28, 2013, 06:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यासंबंधी झालेल्या ‘नागपूर करारा’ला आज ६० वर्षे पूर्ण झाली. वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज या कराराची होळी केली. या आंदोलनासाठी काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांच्या शैक्षणिक संस्थांमधले विद्यार्थी यावेळी आंदोलक म्हणून पकडून आणले होते.
विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यासंदर्भातल्या नागपूर कराराचा दस्तऐवज आंदोलनकर्त्यांनी यावेळी जाळला. या आंदोलनात विदर्भवादी नेत्यांसोबतच मोठ्या संख्येने विद्यार्थीही आले होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा नेतृत्व होतं काँग्रेस नेते रणजीत देखमुख यांचे चिरंजीव आशिष देखमुख यांच्याकडे... विद्यार्थ्यांनी जोशात घोषणा दिल्या... करारही जाळला... मात्र, एकूण त्यांच्या अॅटीट्युडवरून ही निव्वळ एक स्टंटबाजी असल्याचं स्पष्ट दिसत होतं. या विद्यार्थ्यांना विदर्भाबाबत काय माहिती आहे? याची माहिती घेण्याचा मोह आम्हाला आवरला नाही आणि मग विद्यार्थी जे काही बोलले त्यातून त्यांना या मुद्द्यात कितपत रस आहे, हेही उघड झालं.
नागपूर करार वगैरे गोष्टी फारच तांत्रिक झाल्या... या जमवलेल्या गर्दीतल्या विद्यार्थ्यांना तर विदर्भाबाबत बेसिक माहितीही नव्हती. मग, कसल्या स्वतंत्र विदर्भाच्या गप्पा हे विद्यार्थी मारतायत, असा प्रश्नच ‘झी मीडिया’ला पडला. असली गर्दी जमवायची स्टंटबाजी काँग्रेस नेत्यांनी करायचं कारणच काय? असे प्रश्न यानिमित्ताने उभे राहत आहेत. अशी गर्दी जमवून आणि स्टंटबाजी करून वेगळा विदर्भ मिळेल अशी अपेक्षा रणजीत देशमुख आणि त्यांच्या चिरंजिवांची आहे की काय? असा प्रश्न आता विचारला जातोय.

ही गर्दी कोणी जमवली? ही गर्दी जमवायची गरज काय? याची उत्तरं विदर्भवादी नेत्यांना द्यावीच लागतील. अशा मार्गांनी आणि प्रश्नाशी संपूर्ण अनभिज्ञ गर्दीच्या जोरावर विदर्भाची लढाई जिंकता येणार आहे का? विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांची ही स्टंटबाजी राज्यातल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मान्य आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं पुढे आलेत.

विदर्भाबद्दल आंदोलकांनी काय काय उत्तरं दिली.. चला, पाहुयात...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.