मनसे प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याला, उद्धव यांची विदर्भात सुरुवात

मनसेच्या प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुटण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराला पुण्यातून तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विदर्भातून सुरुवात करणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 21, 2014, 08:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेच्या प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुटण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराला पुण्यातून तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विदर्भातून सुरुवात करणार आहेत.
राज ठाकरे यांनी पुण्यातून भाजपविरोधात आपला उमेदवार दिला आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी राज यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा पुण्यातून राज ठाकरे करण्यार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रचाराचा धडाका विदर्भात चार एप्रिलपासून सुरू होणार आहे. दोन्ही नेते आता या प्रचार कार्यक्रमाला अंतिम स्वरुप देणार आहेत. या दोन्ही नेत्यांचे दौरे कसे आणि कुठे असतील.
मनसेचा प्रचार
- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर
मनसेच्या प्रचाराचा
नारळ फुटणार
- मनसेच्या प्रचाराला
पुण्यातून होणार
सुरुवात
- राज ठाकरेंची पहिली
सभा गुढी पाडव्याला
पुण्यात होण्याची शक्यता
- प्रत्येक मतदारसंघात मनसेच्या
दोन सभा आणि रोड शो
- मनसेच्या प्रचाराची शेवटची
सभा २१ किंवा २२ एप्रिलला
मुंबईत
शिवसेनेचा प्रचार
- उद्धव ठाकरेंचा
४ एप्रिलपासून विदर्भात
प्रचाराचा धडाका
- उद्धव ठाकरेंचा
४ एप्रिलपासून विदर्भात
प्रचाराचा धडाका
- ४ ते ८ एप्रिलदरम्यान
विदर्भात प्रचाराचा धडाका

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.