www.24taas.com, झी मीडिया, वर्धा
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २० मार्चला विदर्भाच्या दौ-यावर जाणार आहे. मोदी वर्ध्यात पांढरकवडा इथं चाय पे चर्चा हा कार्यक्रम होणार आहे. लोकसभा निवडणुकीत गुंतलेल्या नेत्यांना आता कुठे खडबडून जाग आलीये. आता सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचार सभा रद्द केल्या आणि सुरू झाली गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ.
मोदी तिथं आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांशी बातचीत करणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर मोदींची महाराष्ट्रातील हा पहिलाच मोठा कार्यक्रम असणार. मोदी वर्ध्यात मोठी रॅली घेण्याची शक्यता आहे.
गारपीटीनं राज्यातला बळीराजाच्या डोळ्यातून पाणी काढलं असताना अखेर सगळ्याच राजकीय पक्षांचं त्यांच्याकडे लक्ष गेलंय. त्यामुळेच प्रचारसभा रद्द करून नेते मंडळी गारपीटग्रस्त भागाकडे धाव घेतायत. प्रचार सभा घ्यायच्या की गारपीट भागाचा दौरा करायचा या द्विधा मनःस्थितीत राजकीय नेते होते. आता मात्र तीव्र लोकभावना लक्षात घेऊन त्यांनी आपल्या प्रचार सभा तुर्तास होल्डवर ठेवल्याचं दिसतंय.
मुंबई आणि कोकण वगळता संपूर्ण राज्यावर आस्मानी संकट कोसळलंय. गारपीट आणि अवकाळी पावसानं बळीराजा हवालदिल झालाय. हाता-तोंडाशी आलेली पिकं नेस्तनाबूत झालीयेत. अशात या शेतकऱ्याला गरज आहे ती आधाराची. मात्र गेल्या 10-12 दिवसांपासून गारपीटीनं हैराण झालेल्या बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी ना मंत्री फिरकले होते ना सरकारला उठता-बसता धारेवर धरणारे विरोधी पक्षांचे नेते.
त्यातच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वांनीच आपापले प्रचारदौरे आखले होते. पण निसर्गाला त्याचं काय देणं-घेणं... राज्यावर गारांचा मारा सुरूच आहे. शेतीच्या नुकसानीचा आकडा वाढत चाललाय.. त्यानंतर आता कुठे नेतेमंडळींना खडबडून जाग आलीये. आता सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचार सभा रद्द केल्या आणि सुरू झाली गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ.
गारपीटीनं राज्यातला बळीराजाच्या डोळ्यातून पाणी काढलं असताना अखेर सगळ्याच राजकीय पक्षांचं त्यांच्याकडे लक्ष गेलंय. त्यामुळेच प्रचारसभा रद्द करून नेते मंडळी गारपीटग्रस्त भागाकडे धाव घेतायत. प्रचार सभा घ्यायच्या की गारपीट भागाचा दौरा करायचा या द्विधा मनःस्थितीत राजकीय नेते होते. आता मात्र तीव्र लोकभावना लक्षात घेऊन त्यांनी आपल्या प्रचार सभा तुर्तास होल्डवर ठेवल्याचं दिसतंय.
मुंबई आणि कोकण वगळता संपूर्ण राज्यावर आस्मानी संकट कोसळलंय. गारपीट आणि अवकाळी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आसमंतात नेत्यांची हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागली. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी किंवा किमान तसं भासवण्याची स्पर्धाच राजकीय पक्षांमध्ये सुरू झालीये.
शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील आपली प्रचारसभा रद्द करून गारपीटग्रस्त बीड जिल्ह्याची पाहणी केली. गोपीनाथ मुंडे बीडमध्येच मुक्काम ठोकून आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पाहणी दौरा काढला. मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदमही पाहणी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत आढावा बैठक घेतली आणि तेही दोन दिवसांच्या मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर गेले. शिवसेनेचे नेतेही गारपीटग्रस्त भागाचा दौरा करून आले. तर राज ठाकरेही आपल्या पाहणी दौऱ्यावर रवाना झाले.
सध्या सगळ्याच पक्षांनी आपल्या प्रचार सभा आणि प्रचार दौरे बाजूला ठेवले आहेत. सर्वच पक्षांचा भर आहे तो गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यावर.. मात्र राजकीय नेत्यांच्या या पाहणी दौऱ्यातून कोसळलेल्या बळीराजाच्या पदरात काही पडणार का.. बळीराजा पुन्हा ताकदीने उभा राहणार का हा खरा प्रश्न आहे अन्यथा राजकीय नेत्यांचे हे दौरे म्हणजे एक फार्सच ठरेल
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.