भारताच्या बॉर्डवर असलेल्या या देशात मिळते दुबई पेक्षा स्वस्त सोनं; देशाचे नाव ऐकून शॉक व्हाल

Cheapest Gold : भारतात सोनं खरेदीवर जीएसटी, आयात शुल्क, कृषी उपकर आणि टीडीएस सारखे कर आकारले जातात. यामुळे भारतात सोनं महाग मिळते. दुबईत मात्र, सोनं स्वस्त मिळते. भारताच्या बॉर्डवर असलेल्या एका देशात दुबई सारखे स्वस्त सोनं मिळतं.   

वनिता कांबळे | Updated: Dec 20, 2024, 07:36 PM IST
भारताच्या बॉर्डवर असलेल्या या देशात मिळते दुबई पेक्षा स्वस्त सोनं; देशाचे नाव ऐकून शॉक व्हाल  title=

Cheapest Gold In World :  भारतीयांना सोनं खरेदीची मोठी हौस असते. तर, अनेक भारतीय मोठ्या प्रामणात सोन्यामध्ये गुंतवूक करतात. दुंबईत सोनं स्वस्त दरात मिळते यामुळे अनेर भारतीय खास सोनं खरेदीसाठी दुबईत जातात. मात्र, तुम्हाला माहित आहे का भारताच्या बॉर्डवरच एक छोटासा देश आहे जिथे दुबईसारखचं स्वतं दरात सोनं खरेदी करता येवू शकते. विशेष म्हणजे या देशात जाण्यासाठी भारतीयांना व्हिजा देखील लागत नाही. जाणून घेऊया हे देश कोणता आहे. 

हे देखील वाचा... भारतातील एकमेव राज्य जिथे करोडो कमावले तरी 1 रुपयांचाही टॅक्स भरावा लागत नाही; इथंच जाऊन बिजनेस करा

दुबई हा देश जगभरात लक्झरी लाईफस्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. यासह इथं अगदी स्वस्त दरात सोनं मिळत असल्याने यासाठी देखील अनेक जण दुबईला आवर्जून भेट देतात. दुबईत सर्वात शुद्ध सोनं मिळते. दुबईच्या गोल्ड मार्केटमध्ये सोनं आंतरराष्ट्रीय किमतीनुसार विकले जाते. दुबई सरकार सोन्यावर एकसमान 5 टक्के व्हॅट आकारते. सोन्याच्या बिस्किटे किंवा कच्च्या मालावर कोणताही कर आकारला जात नाही. दुबईमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर लागणारा मेकिंग चार्जही खूपच कमी आहे. यामुळे अनेकजण दुबईतून सोनं खरेदी करण्यास प्राधान्य देतात. दुबईहून भारतात शुल्क मुक्त सोनं आणण्याची मर्यादा पुरुषांसाठी फक्त 20 ग्रॅम तर, महिलांसाठी 40 ग्रॅम आहे. यापेक्षा जास्त सोनं आणल्यास मोठा कर भरावा लागेल. 

हे देखील वाचा... पृथ्वीच्या पोटात सापडला सर्वात पावरफुल खजिना! पुढच्या 200 वर्षांची चिंता मिटली

दुबई प्रामणेच भारताच्या बॉर्डरवर असलेल्या भूतान (Bhutan) या देशात देखील भारतीयांना स्वस्तात सोनं खरेदी करता येवू शकते. भूतान हा देश लोकप्रिय टूरीस्ट डेस्टिनेशन आहे. शात, सुंदर अशा या देशात जगभरातून पर्यटक फिरायला येतात. भारतीयांना भूतान देश हा व्हीजा फ्री आहे.  काही नियमांनुसार भूतान देशात स्वस्त दरात सोनं खरेदी करता येवू शकते. 

भूतान या देशात सोन्यावर कोणताही कर लावला जात नाही. याशिवाय आयात शुल्कही खूप कमी आहे. भारत आणि भूतानच्या चलनाचे मूल्य समान असल्याने भारतीय पर्यटकांसाठी ते अधिक फायदेशीर ठरते. भूतानमध्ये विशेष शुल्क मुक्त स्टोअरमधून सोने खरेदी केले जाऊ शकते. ही स्टोअर्स साधारणपणे भूतान सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. पर्यटक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय येथून सोने खरेदी करू शकतात. भूतानमध्ये अशी काही स्टोर आहेत जिथून विशेष शुल्क मुक्त स्टोअरमधून सोने खरेदी केले जाऊ शकते. ही स्टोअर्स भूतान सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येतात.

हे देखील वाचा... 23 विमानतळं असलेले भारतातील एकमेव राज्य, नाव ऐकून शॉक व्हाल, 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक एअरपोर्ट...

पर्यटक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय येथून सोने खरेदी करू शकतात. विदेशी पर्यटकांना भूतान सरकारने प्रमाणित केलेल्या हॉटेलमध्ये किमान एक रात्र राहणे आवश्यक आहे. यासोबतच पर्यटकांनी सोने खरेदीची पावती घेणेही आवश्यक आहे. सोने खरेदी करण्यासाठी पर्यटकांना अमेरिकन डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. मात्र, भारतीयांसाठी  पेमेंट प्रक्रिया अगदी सोपी ठेवण्यात आली आहे.