गडचिरोलीत माओवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद

 उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा गावचा रहिवासी उमेश पांडुरंग जावळे (31) हा जवान गडचिरोली  जिल्ह्यातील ग्यारापत्ती जंगलामध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झाला. पांडुरंग जावळे यांचा तो एकुलता अविवाहीत मुलगा होता. 

Updated: Jun 27, 2014, 04:01 PM IST
गडचिरोलीत माओवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद title=

गडचिरोली :  उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा गावचा रहिवासी उमेश पांडुरंग जावळे (31) हा जवान गडचिरोली  जिल्ह्यातील ग्यारापत्ती जंगलामध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झाला. पांडुरंग जावळे यांचा तो एकुलता अविवाहीत मुलगा होता. 

माओवाद्यांनी आज सकाळी केलेल्या हल्यात उमेश हुतात्मा झाला. ग्यारापत्तीच्या जंगलामध्ये माओवाद्यांनी जोरदार हल्ला चढवला.दरम्यान, जंगलामध्ये पोलिसांचे पथक दाखल झाले असून, माओवाद्यांचा शोध सुरू आहे.

जावळे कुटुंब एकदम गरीब आहे. अत्यंत हालाखिची आर्थिक परिस्थि, मोलमजुरी करणारे त्याचे आई-वडिल यांचा आता आधारच हरपला आहे. अत्यंत धाडसी तरुण पोलिस दलात दाखल झाला. उमेद शहीद झाल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी 4 च्या सुमारास त्याच्यावर शासकीय इतमाने अत्यंसंस्कार होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.