www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रेसकोर्सवर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी इच्छा असेल तर स्पष्ट बोला असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलंय. तसंच नालेसफाईमधील पैसा `मातोश्री`वर जात असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केलाय.
रेसकोर्सवर वर्षातले फक्त चाळीस दिवस रेस असते. उरलेले दिवस सर्वसामान्यांनाच प्रवेश मिळतो असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलंय. तसंच नालेसफाईचे पैसे थेट मातोश्रीवर जातात हे उद्धव ठाकरेंनी लहानपणापासून पाहीलंय आणि त्याच अनुभवातून त्यांनी राष्ट्रवादीवर आरोप केल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. नालेसफाईचे पैसे थेट मातोश्रीवर जातात हे उद्धव ठाकरे य़ांनी लहानपणापासून पाहीलंय त्याच अनुभवातून त्यांनी राष्ट्रवादीवर आरोप केला असा टोलाही नबाब मलिक यांनी लगावला. मात्र राष्ट्रवादीत अशी संस्कृती नाही, स्टँडींग आऊट स्टँडींगची संस्कृती नाही असं मलिक यांनी ठणकावलंय. रेसकोर्सबाबतही त्यांनी शिवसेनेला धारेवर धरलं. रेसकोर्सवर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी इच्छा असेल तर स्पष्ट बोला असं त्यांनी ठणकावलं.
रेसकोर्सवर वर्षातले फक्त चाळीस दिवस रेस असते. उरलेले दिवस सर्वसामान्यांना प्रवेश मिळतो. तर शिवसेना नेत्यांनी महापालिकेच्या जागेवर ‘मातोश्री’सारखे क्लब सुरू केले. तिथे सर्वसामान्यांना प्रवेश नाही असा आरोपही त्यांनी केला.