www.24taas.com, झी मीडिया, सांगली
भाजप, शिवसेना आणि आरपीआय महायुतीत कोणी येण्याची आता आम्ही वाट पाहणार नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
काँग्रेस विरोधी मतांचे विभाजन होवू नये, यासाठी आमचा आग्रह होता. याचा अर्थ आम्ही कोणाची वाट पाहात आहोत असं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेने पाठोपाठ भाजपने पुढे केलेला मैत्रिचा हात आता मागे घेतलाय.
राज ठाकरे यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही एकटेच लढणार. आम्हाला कोणाच्या युतीची गरज नाही. तसेच राज यांनी आम्हाला बाहेरून न विचारताच शुकशुक करू नका. आमची बदनामी थांबवा. आपल्या पक्षात काय चालले आहे, ते पाहावे असा सल्ला राज यांनी दिला होता.
दरम्यान, मनसेच्या विषयावर पुन्हा बोलण्याची इच्छा नाही असं उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत स्पष्ट केलं. भाजपासोबत आमची युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर आहे. त्यामुळे युतीच्या विस्ताराचा निर्णय आम्ही परस्पर सहमतीनं घेऊ असं उद्धव यांनी सांगितलं. आरपीआय नाराज नसल्याचा खुलासाही त्यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.