कल्याण : कल्याण-डोंबवली महानगर पालिकेत जरी शिवसेनेला सर्वाधिक ५२ जागा मिळाल्या तरी महापौरपद कोणाला द्यायचे यावरून मोठा वाद उफाळलाय. थेट उपजिल्हाप्रमुख यांनी बंडाचे निशाण हाती घेत जय महाराष्ट्र केला. तर अन्य दोघे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
अधिक वाचा : केडीएमसी महापौर : शिवसेनेचे उमेदवार जाहीर, भाजपचा सेनेला प्रस्ताव
महापौर पदासाठी रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे यांची नावे चर्चेत होती. मात्र, संधी दुसऱ्यालाच मिळाल्याने हे दोघे नाराज झाले असून राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तर उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे यांनी शिवसेनेला थेट आव्हानच दिले. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेला रामराम केलाय.
अधिक वाचा : कल्याण-डोंबिवली महापौर निवडणूक : भाजप उमेदवारांकडून अर्ज दाखल
शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजपने महापौर पदावर दावा केलाय. तसा प्रस्तावही शिवसेनेला दिलाय. मात्र, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. अजुन भाजपच्या प्रस्तावर चर्चाही झालेली नाही. त्याचवेळी शिवसेनेत नाराजी उफाळून आल्याने कल्याण-डोंबिवली पालिकेत काय होणार, याचीच जोरदार चर्चा सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.