पूर्वाश्रमीचे शिवसैनिक सुरेश प्रभू मातोश्रीवर..

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली... प्रभू हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत... 

Updated: Nov 12, 2015, 05:44 PM IST
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक सुरेश प्रभू मातोश्रीवर.. title=

मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली... प्रभू हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत... 

NDAच्या वाजपेयी सरकारमध्ये ते शिवसेनेचे मंत्री होते. मात्र त्यानंतर काहीसे अडगळीत पडलेल्या प्रभूंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा सक्रीय राजकारणात आणलं. 

रेल्वेसारखं अत्यंत महत्त्वाचं खातं देऊन भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेत पाठवलं... मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रभूंच्या कामाबाबत पंतप्रधान कार्यालय नाराज असल्याची चर्चा आहे... 

त्या पार्श्वभूमीवर त्यांची मातोश्री भेट महत्त्वाची मानली जातेय... अर्थात, ही केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घेतलेली सदिच्छा भेट आहे, असं शिवसेना नेते सांगतायत... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.