satara

रेशनिंगच्या मालाचं अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात

रेशनिंगमध्ये अनेक ठिकाणी माफियाराज पाहायला मिळतेय. त्यामुळे अनेकांचं धान्य आणि साखर परस्पर बाजारात विकली जातेय, या माफियांना आळा घालण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून रेशनिंग कार्ड थेट आधारकार्डला लिंक अप करण्याचं काम सुरू आहे.

Nov 19, 2014, 07:07 PM IST

पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत सहा ठार

सातारा तालुक्यातील पारगाव खंडाळा इथं भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटून झालेल्या विचित्र अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Nov 16, 2014, 01:25 PM IST

नेतेही झाले ‘टेक्नोसॅव्ही’; पंकजाचं ‘टेलिफोनिक’ भाषण

सध्याच्या तरुणांसोबत राजकारणातील नेतेही टेक्नोसॅव्ही झालेत. त्याचंच एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं ते साताऱ्यात... 

Oct 10, 2014, 08:48 PM IST

ऑडिट : पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकीय भवितव्य पणाला

कराड दक्षिण मतदारसंघातल्या लढतीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण या मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलंय. 

Oct 8, 2014, 09:52 AM IST

उदयनराजे भोसलेंचा राष्ट्रवादीला इशारा, नेत्यांची धावपळ

सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद देण्याचं आश्वासन देऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं खासदार उदयनराजे भोसले यांचा राग शांत केला. कार्यकर्त्यांना डावलल्यास राजकीय गड नेस्तनाबूत करू असा इशारा उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीला दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा इशारा दिल्याने राष्ट्रवादीचे धावपळ उडाली.

Sep 20, 2014, 05:19 PM IST

साताऱ्यात डॉल्बीच्या आवाजानं भिंत कोसळली, ३ ठार

गणेश विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बीच्या जोरदार आवाजामुळं भिंत कोसळून ३ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यात घडली आहे. 

Sep 9, 2014, 11:12 AM IST

साताऱ्यात दिसला उद्यनराजेंचा विजयोन्माद!

या विजयानंतर उदयनराजेंच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही... आणि यापूर्वी अनेकदा दिसून आलेला `माज` शुक्रवारी काही औरच होता.

May 17, 2014, 04:19 PM IST