पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत सहा ठार

सातारा तालुक्यातील पारगाव खंडाळा इथं भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटून झालेल्या विचित्र अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Updated: Nov 16, 2014, 01:25 PM IST
पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत सहा ठार title=

सातारा: सातारा तालुक्यातील पारगाव खंडाळा इथं भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटून झालेल्या विचित्र अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पारगाव खंडाळा इथल्या एसटी स्टँडवर काही प्रवासी एसटी बसची वाट बघत होते. या दरम्यान भरधाव वेगात असलेल्या चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटलं आणि हा कंटेनर बसची वाट बघणाऱ्या प्रवाशांवर जाऊन उलटला.  यात सुमारे दहा प्रवासी कंटेनरखाली चिरडले गेले आहे. 

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरु झालंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.