www.24taas.com, झी मीडिया, सातारा
साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार उद्यनराजे भोसले यांनी तब्बल 5 लाख 22 हजार 231 मतांसहीत विजयी झाले. त्यांच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी 1 लाख 55 हजार 937 तर तिसऱ्या क्रमांकावर असणारे `आप`चे उमेदवार राजेंद्र चोरघे यांना 82,489 मतं मिळाली. या विजयानंतर उदयनराजेंच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही... आणि यापूर्वी अनेकदा दिसून आलेला `माज` शुक्रवारी काही औरच होता.
सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपती उदयनराजे भोसले पुन्हा देशात दुसऱ्या क्रमांकावरील मताधिक्याने तब्बल तीन लाख ६६ हजार ५९४ मतांनी विजयी झालेत. `लोकांनी भरभरुन दिलं... मला आपटलं नाही... हेच माझं कला-कौशल्य... जनतेचं ऋण आजपर्यंत फेडत आलोय, यापुढेही फेडत राहीन... वाट्टेल त्या परिस्थितीत त्यांचा विरस होऊन देणार नाही` असं मोडक्या तोडक्या शब्दांत त्यांनी लोकांचे आभार मानले.
यानंतर हा उदयनराजेंच्या कर्तृत्वाचा करिश्मा की एकूण पक्षाचंही त्यामध्ये योगदान आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता... `कार्ट्यांनो.. असे घाणेरडे प्रश्न तुम्ही मला विचारणार हे मला माहितच होतं...` असं पत्रकारांना डोळे मारत उद्यनराजेंनी उत्तर दिलं...
हा मोदी फॅक्ट आहे का? या पत्रकारांच्या प्रश्वार उत्तर देताना `हा मोदी फॅक्टर नाही... हा उद्यनराजे फॅक्टर आहे... उदयनराजे फॅक्टर हा फॅक्टरच आहे... कुणीपण, कीतीपण, काहीपण, असं जरी केलं... तसं जरी केलं... कसं जरी केलं... तरी वाघ कुठं पिंजऱ्यात राहतो का? लोकं स्वत:ला फार मोठे समजायला लागलेत... त्यापैंकी मी नाही...` असं असंबंधपणे उदयनराजे बडबडत राहिले.
यानंतर, साताऱ्यात इतर सतराच्या सतरा उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाल्याबद्दल पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता... `मी इथं काय माझं सर्टिफिकेट घ्यायला आलोय... मी इथं आलोय त्यांची डिपॉझिट जप्त करायला... या कधी तुम्ही पण, तुम्हालाही देईन थोडं थोडं...` असं त्यांनी पुन्हा एकदा डोळे मिचकावत पत्रकारांना म्हटलं... यावेळी, उदयनराजेंचा तोरा काही औरच होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.