उदयनराजे पवारांना म्हणतात, साहेब मला आशीर्वाद द्या...
साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या हातानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवून घेतला...
Feb 23, 2013, 10:55 PM ISTराज नाशिक सुधारा, मग राज्याचं बोला – अजित पवार
नकला करणे, भडक भाषणं करणे, प्रक्षोभक विचार मांडणे ही ठाकरे परिवाराची परंपरा आहे. ते शिवराळ भाषाही वापरतात, पण त्याने ना रोजगार मिळतो ना पाणी. आपल्याजवळ महाराष्ट्रा च्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असल्याचे ते सांगतात, पण आधी त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली नाशिकची महापालिका सुधारून दाखवावी, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.
Feb 20, 2013, 06:03 PM ISTसाताऱ्यात पोलिसांवर दगडफेक, तीन एसटी फोडल्या
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कालच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे. आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साता-यात आंदोलन केलं. पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली तर साता-यातल्या शिवथरजवळ कार्यकर्त्यांनी तीन एसटी फोडल्या. दरम्यान, आंदोलकांच्या मृत्यूंच्या निषेधार्थ इंदापूर बंद पुकारण्यात आलाय.
Nov 13, 2012, 01:45 PM ISTऐतिहासिक `शेवरले` ठरली मिरवणुकीचं आकर्षण...
बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करणार पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कर्मवीर भाऊराव पाटलांची ‘शेवरले’ गाडी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली.
Sep 22, 2012, 07:17 PM ISTमाझा सोक्षमोक्ष लावा - उदयनराजे
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केलीय. पवार साहेब एकदाच काय तो सोक्षमोक्ष करा, असे खुले आव्हान दिले आहे.
Aug 12, 2012, 09:59 AM ISTचक्क गाढवाचं लग्न लावलं
मुंबई आणि कोकणात पावसानं हजेरी लावली असली तरी साता-यातली जनता मात्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस नसल्यानं शेतकरीवर्ग चिंतेत आहे. पाऊस पडावा यासाठी सातारा शहरात चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आलं.
Jul 12, 2012, 09:52 PM ISTमाऊलींची पालखी फलटणमध्ये होणार दाखल
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सातारा जिल्ह्यातील फलटण इथं प्रस्थान करणार आहे.
Jun 22, 2012, 08:27 AM ISTमाऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण आज
पंढरीच्या वारीमध्ये आज रिंगण सोहळ्यांची पर्वणी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंदवरून पंढरपूरकडे मार्गस्थ झालीय. तरडगावजवळ ‘चांदोबाचा लिंब’ इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण रंगणार आहे.
Jun 21, 2012, 11:43 AM ISTसाता-यातही भ्रूणहत्या
साता-यातही भ्रूणहत्येचा प्रकार उघड झालाय. सातारा जिल्ह्यातल्या काशीळ गावातल्या एका बोगस डॉक्टरनं एका महिलेचा गर्भपात केलाय. सिकंदर शेख असं या डॉक्टरचं नाव आहे.
Jun 10, 2012, 09:47 PM ISTमहाराष्ट्रासाठी कोणीही एकत्र येत नाही- पवार
दुष्काळाच्या मुद्यावर सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत कृषीमंत्री शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. शरद पवारांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
May 9, 2012, 11:49 AM ISTराहुल गांधींचे अडीच तासांत दुष्काळ पर्यटन!
महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी राहुल गांधी साता-यात आले. राहुल गांधींनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. फक्त अडीच तासांत युवराजांनी दौरा आटोपला. तहानलेल्या महाराष्ट्राच्या व्य़था अवघ्या अडीच तासांत राहुल गांधींना कळल्या.
Apr 29, 2012, 09:34 AM ISTदुष्काळ : राहुल यांचे गुळगुळीत आश्वासन
सातारा दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी माण खटाव तालुक्यातल्या जासी गावाला भेट दिली. यावेळी जासी गावच्या सरपंच मिनाक्षी पवार यांनी राहुल गांधी यांच्यासमोर गावक-यांची व्यथा मांडली. तर आम्हाला पैसे नको, कायचं पुरेसं पाणी द्या...अशी व्यथा जासी गावच्या ग्रामस्थांनी राहुल गांधींसमोर मांडली. ग्रामस्थांना आश्वासन देताना राहुल म्हणाले, केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे. दुष्काळ भागातील प्रश्न सोडविण्यात येतील. मी दिल्लीत गेल्यावर याप्रश्नी लक्ष घालीन.
Apr 28, 2012, 01:49 PM ISTराष्ट्रवादीला शह देण्यासाठी राहुल दौरा
साता-यातला दुष्काळी भागातला दौरा राहुल गांधींनी अवघ्या अडीच तासांत आटोपलाय. फक्त आश्वासन देऊन राहुल गांधींनी ग्रामस्थांची बोळवण केलीय. महत्त्वाचा प्रश्न हा की राहुल गांधींना महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या व्यथा कळल्या का.... दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी या भागाचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, नंतर शरद पवारांनीही या भागाचा दौरा केला. त्यानंतर आता राहुल गांधींनी याच भागाचा दौरा केला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा एकमेकांना शह देण्याचा प्रकार सुरू आहे.
Apr 28, 2012, 01:40 PM ISTराहुल गांधीना प्रश्न, गावात पाणी का नाही?
काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाचा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जासी गावाला भेट दिली. पहिल्याचे भेटीत गावकऱ्यांनी राहुल यांनी प्रश्न केला, आमच्या गावात पाणी का नाही? या दौ-यातून दुष्काळग्रस्तांसाठी कोणतल्या ठोस उपाययोजना होणार याकडं लक्ष लागले आहे. केवळ दिखाऊ दौरा नको ठोस उपाययोजना हव्यात ,अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे खासदार उदनयराजेंनी व्यक्त केली आहे.
Apr 28, 2012, 09:23 AM ISTदुष्काळामुळे साताऱ्यात भीषण परिस्थिती
दुष्काळामुळे सातारा जिल्ह्यातल्या माण-खटावमधील परिस्थिती भीषण आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळं खरीप हंगाम वाया गेला. तर, परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं रब्बी हंगाम देखील हातचा गेला. अशा प्रतिकूल परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी जिद्दीनं डाळिंब, द्राक्षाच्या बागा फुलवल्या. मात्र आता पाण्याविना या बागाही जळू लागल्या आहेत.
Apr 22, 2012, 10:50 PM IST