rajesh khanna

'काकां'चा शेवटचा चित्रपट वितरकाच्या प्रतीक्षेत

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा शेवटचा चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. पण, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सिनेमा दिग्दर्शकांना वितरकच मिळत नाहीत.

Dec 28, 2012, 03:24 PM IST

राजेश खन्ना-अनिता अडवानी `रिलेशनशिप` अवैध

राजेश खन्ना आणि अनिता अडवानी हे दोघे एकमेकांशी विवाह करण्यास पात्र नसल्याने त्यांच्यातील लीव्ह इन रिलेशनशिप वैध ठरत नाही.

Dec 4, 2012, 04:30 PM IST

अनीता अडवाणीला कोर्टाचा झटका

मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत सुपरस्टार राजेश खन्नाच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या खटल्याची कार्यवाही १७ डिसेंबरपर्यंत थांबवली आहे. अनिता अडवाणी हिने डिंपल कपाडीया, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्याविरोधात मारहाणीचा दावा केला होता.

Dec 3, 2012, 04:47 PM IST

खन्ना संपतीवरून डिंपलचे अनिताला आव्हान

सुपरस्टार राजेश खन्ना तथा काका यांच्या ५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वाद हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. अनिता अडवाणी नव्हेत, तर आपणच या मालमत्तेचे खरे वारस असल्याचा दावा करणारी याचिका अभिनेत्री डिंपल कापडिया यांनी दाखल केली आहे. त्यामुळे नवा वाद पुढे आला आहे.

Dec 2, 2012, 04:41 PM IST

काका परिवार आणि अनिता अडवाणीमध्ये तडजोड

दिवंगत राजेश खन्ना यांच्या संपत्तीवरून वाद निर्माण झाला. हा वाद न्यायालयात गेला. त्यामुळे फैसला कोणाच्या बाजुने लागणार याची उत्सुकता होती. मात्र, निर्णय टाय झाला. कारण लिव-इन पार्टनर अनिता अडवाणी आणि राजेश खन्नास परिवार, पत्नी डिंपल, अक्षय, ट्विंकल यांच्यामध्ये समझोता करण्यास सहमती दर्शविली आहे.

Nov 28, 2012, 04:15 PM IST

राजेश खन्नांनी केलं माझं लैंगिक शोषण- अनिता

अभिनेता आणि बॉलीवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत १० वर्ष सोबत राहण्याचा दावा करणारी आणि लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये असणारी अनिता अडवाणीने आता एक नवा खुलासा केला आहे.

Nov 26, 2012, 09:31 PM IST

अक्षय-ट्विंकलने दिले मुलीला 'काकां'चे आडनाव

अभिनेता अक्षय आणि ट्विंकलच्या नवजात कन्येचं ‘नितारा खन्ना भाटीया’ असं नामकरण करण्यात आलं आहे. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना श्रद्धांजली म्हणून अक्कीने आपल्या कन्येच नाव नितारा खन्ना भाटीया असं केल आहे.

Oct 2, 2012, 01:23 PM IST

'काका'च्या संपत्तीतून डिंपल बेदखल

बॉलिवूडचा एकमेव ‘सुपरस्टार’ अशी उपाधी मिळवलेल्या राजेश खन्ना यांनी १८ जुलै रोजी या जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्या मृत्यूनंतर अनिता अडवाणी हीनं राजेश खन्ना यांच्या ‘आशिर्वाद’ बंगल्यावर हक्क दाखवला आणि काकांच्या मृत्यूनंतर संपत्तीवाद चव्हाट्यावर आला. आता या वादात आणि भर पडलीय. कारण, राजेश खन्ना यांनी बनवलेल्या मृत्यूपत्रात त्यांची पूर्व पत्नी डिंपल कपाडिया हिला संपत्तीतून बेदखल केलंय.

Jul 29, 2012, 01:36 PM IST

सुपरस्टारच्या कोट्यवधी संपतीवरून वाद

बॉलिवूडचा सुपरस्टार राजेश खन्ना यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या मागे २०० कोटी रूपयांची संपती आहे. मात्र, ही संपती आता वादात सापडली आहे. या संपतीवर आता अनिता अडवाणी हिचा डोळा असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिता हि सुरस्टारची माजी प्रेयसी आहे. ती अनेक वर्ष लग्न करण्याची तयारी करीत होती. कारण तिला राजेश खन्नांच्या संपतीत रस होता, अशी सूत्रांची माहिती आहे.

Jul 20, 2012, 01:59 PM IST

अच्छा तो हम चलते है....

बॉलिवूड सुपरस्‍टार राजेश खन्ना यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना आज पुन्हा रूग्णालयात प्राणज्योत माळवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांनी हिंदी चिपटसृष्टीत त्यांचा नावाचा दबदबा होता. पहिला सुपस्टारची एक्झीट झाली आहे.

Jul 19, 2012, 05:23 PM IST

अंजू महेंद्रू स्मशानभूमीत पोहचली तेव्हा...

सुपरस्टार राजेश खन्ना यांचं पहिलं प्रेम म्हणजे अंजू महेंद्रू... इतकी वर्ष एकमेकांचा चेहराही न पाहणारे दोघे जण समोरासमोर आल्यावर काय घडलं असेल? आज काकांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या अंजूला स्वत:ला आवरणं कठीण झालं आणि तीनं आपल्या आसवांना सर्वांदेखत वाट मोकळी करून दिली.

Jul 19, 2012, 05:06 PM IST

काकांच्या अंत्ययात्रेला गालबोट, चाहत्यांवर लाठीहल्ला

आपल्या आवडत्या सुपरस्टार काकांची शेवटची झलक पाहता यावी यासाठी लाखो चाहते आज त्यांच्या अंतयात्रेत सामील झाले होते. तर विलेपार्लेतल्या स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Jul 19, 2012, 01:52 PM IST

बॉलिवूडच्या सुपरस्टारला अलविदा

आज सकाळी दहा वाजल्यापासून चाहत्यांनी बांद्रा ते विलेपार्ले दरम्यानचा रस्ता फुलून गेला होता. आपल्या लाडक्या अभिनेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आणि अलविदा करण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या पार्थिवावर आज पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात य़ेणार आहेत. लाडक्या आनंदला अलविदा करण्यासाठी चाहत्यांची गर्दी मोठ्याप्रमाणात दिसून येत होती.

Jul 19, 2012, 12:00 PM IST

एक होता सुपरस्टार...

ऱाजेश खन्ना हे नाव उच्चारलं की नजरेसमोर येणारा पहिला शब्द म्हणजे सुपरस्टार.. राजेश खन्नाची जादू स्क्रीनवरची जादू काही काळानंतर ओसरली असली तरी प्रत्येकाच्या मनात विराजलेला सुपरस्टार नेहमीच टॉपवर राहीला. एका टॅलेंट हंटद्वारे सिनेसृष्टीत आलेला चेहरा सुपरस्टार कधी बनला ते कळलंच नाही.

Jul 18, 2012, 11:45 PM IST

राजेश खन्ना यांना 'ट्विटर'वरून श्रद्धांजली

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नफरत की दुनिया को छोड के प्यार की दुनिया में, खूश रहना मेरे यार...

Jul 18, 2012, 04:49 PM IST