NASA Deorbit The International Space Station : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station अखरे नष्ट होणार आहे. एलॉन मस्क (Elon Musk) हे NASA चे International Space Station उद्ध्वस्त करणार करणार आहेत. एलॉन मस्क यांची कंपनी SpaceX ला International Space Station डिऑर्बीट करण्याचे कंत्राट मिळाले आहे. नासाने SpaceX कंपनीसह 7,036 कोटींची डील केली आहे.
NASA ने International Space Station नष्ट अर्थात डिऑर्बीट करण्याचा निर्णय घेतला होता. एका स्पेसक्राफ्टच्या मदतीने हे स्पेस स्टेशन नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. ज्याप्रमाणे स्पेस स्टेशन अंतराळात स्थापित करणे खूपच आव्हानात्मक असते. त्यापेक्षा स्पेस स्टेश डिऑर्बीट करणे तितकेच धोकादायक आहे. यामुळे यासाठी खास नियोजन करावे लागते.
अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची स्थापन केली आहे. पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. येथे कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करत आहेत. हे International Space Station अंतराळात पृथ्वीभोवती फिरत आहे. दरम्यान या स्पेस स्टेशनवर काम करणाऱ्या अंतराळवीरांना 16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवा लागतो.
15 वर्षाची वयोमर्यादा असलेल्या स्पेस स्टेशनने 21 वर्ष काम केले
International Space Station ची वयोमर्यादा 15 वर्षाची आहे. प्रत्यक्षात मात्र या स्पेस स्टेशनने 21 वर्ष काम केले आहे. 2023 पर्यंत International Space Station निवृत्त करण्याची नासाची योजना आहे. 20 नोव्हेबर 1998 पासून International Space Station ची उभारणी करण्यात आली. एक एक भाग अंतराळात नेऊन अंतराळात या स्पेस स्टेशनची उभारणी करण्यात आली. युनायटेड स्टेट्स, जपान, कॅनडा आणि ESA (युरोपियन स्पेस एजन्सी) च्या सहभागी देशांनी 2030 पर्यंत सहकार्य करण्याचा करार केला आहे. तर, रशिया 2028 पर्यंत International Space Station मोहिमेत सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
International Space Station ची कार्यक्षमता कमकुवत झाली आहे. International Space Station नष्ट करण्यासाठी खास स्पेसक्राफ्ट तयार केले जाणार आहे. US Deorbit Vehicle (USDV) असे या स्पेस क्राफ्टचे नाव असणार आहे. यासाठी नासाने निविदा मागवल्या आहेत. International Space Station सुरक्षितरीत्या डिऑर्बीट करण्याची जबाबदारी या US Deorbit Vehicle वर असणार आहे. अखेर हे स्पेसक्राफ्ट तयार करण्याचे कंत्राट एलॉन मस्क यांची कंपनी SpaceX ला मिळाले आहे. US Deorbit Vehicle स्पेसक्राफ्ट तयार करण्यासाठी नासा आणि SpaceX कंपनी यांच्यात करार झाला आहे. नासाने SpaceX कंपनीला यासाठी 7,036 कोटी डॉलरचे कंत्राट दिले आहे.
US Deorbit Vehicle हे विशिष्ट प्रकारचे स्पेसक्राफ्ट असणार आहे. याच्या मदतीने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उद्ध्वस्त करून योग्य विल्हेवाट लावली जाणार आहे. निर्मनुष्य प्रदेश अशी ओळख असलेल्या दक्षिण प्रशांत महासागरात हे स्पेस स्टेशन नष्ट केले जाईल. 2031 पर्यंत स्पेस स्टेशन ऑर्बिट बाहरे असेल. येथेच त्याची व्हिल्हेवाट लावली जाणार आहे.