अंजू महेंद्रू स्मशानभूमीत पोहचली तेव्हा...

सुपरस्टार राजेश खन्ना यांचं पहिलं प्रेम म्हणजे अंजू महेंद्रू... इतकी वर्ष एकमेकांचा चेहराही न पाहणारे दोघे जण समोरासमोर आल्यावर काय घडलं असेल? आज काकांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या अंजूला स्वत:ला आवरणं कठीण झालं आणि तीनं आपल्या आसवांना सर्वांदेखत वाट मोकळी करून दिली.

Updated: Jul 19, 2012, 05:06 PM IST

www.24taas.com, मुंबई

सुपरस्टार राजेश खन्ना यांचं पहिलं प्रेम म्हणजे अंजू महेंद्रू... इतकी वर्ष एकमेकांचा चेहराही न पाहणारे दोघे जण समोरासमोर आल्यावर काय घडलं असेल? आज काकांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या अंजूला स्वत:ला आवरणं कठीण झालं आणि तीनं आपल्या आसवांना सर्वांदेखत वाट मोकळी करून दिली.

राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांचं अफेअर बरंच गाजलं… तितकाच त्यांचा ब्रेकअपही... ब्रेकअपनंतर मात्र काकांनी डिंपल कपाडीयासोबत लग्न केलं. या मागचं कारण दोघांनीही सांगितलं नाही काही काळानंतर अंजूनं क्रिकेटर गॅरी सोबर्ससह साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण, आज मात्र अंजू राजेश खन्ना यांच्या अंत्यदर्शनाला विलेपार्लेच्या स्मशानभूमीत उपस्थित झाली. यावेळी काकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार विधी पार पडत होते. स्मशानात काकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असताना पत्नी डिंपल त्यांच्या चेह-याला तूप लावत होती तेव्हा अंजूने 'काका'चे पाय पकडलेले होते, आणि ती 'काका काका' म्हणत ओक्साबोक्शी रडत होती. काकांना आरवनं-त्यांच्या नातवानं मुखाग्नी दिल्यानंतर अंजूचा संयम सुटला आणि तिनं जमीनीवर स्वत:ला झोकून दिलं.

ब्रेकअपनंतर कित्येक वर्ष राजेश खन्ना आणि अंजू यांनी एकमेकांना भेटणं तर सोडाच पण एकमेकांचं तोंडही पाहीलं नव्हतं. अंजू महेन्द्रू, डिंपल कपाडीया, टीना मुनिम आणि अशा कित्येक स्त्रिया काकांच्या आयुष्यात आल्या अन् गेल्याही. पण, काकांचा तिरस्कार करणं मात्र कुणालाही जमलं नाही.