www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचा सुपरस्टार राजेश खन्ना यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या मागे २०० कोटी रूपयांची संपती आहे. मात्र, ही संपती आता वादात सापडली आहे. या संपतीवर आता अनिता अडवाणी हिचा डोळा असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिता हि सुपरस्टारची माजी प्रेयसी आहे. ती अनेक वर्ष लग्न करण्याची तयारी करीत होती. कारण तिला राजेश खन्नांच्या संपतीत रस होता, अशी सूत्रांची माहिती आहे.
मुंबईतील बांद्रा येथील कार्टर रोडवर 'आशीर्वाद' बंगल्यात राजेश खन्ना आजारी असताना त्यांची देखभाल अनिता हिने आठ वर्षे घेतली. त्यामुळे मला 'आशीर्वाद' या बंगल्यातून बाहेर काढू नका, अशी नोटीसच अनिताने खन्ना परिवारातील सदस्यांना पाठविली आहे. त्यामुळे ती या बंगल्याचा एक हिस्सा असल्याचे म्हटले जात आहे. २०० कोटी रूपयांची संपत्तीत आशीर्वाद हा बंगलाही आहे. राजेश खन्ना यांच्या इच्छेनुसार हा बंगला संग्राहलायात रूपांतरीत करण्यात यावा, अशी मुलींचे म्हणणे आहे. मात्र, अनिताने या बंगल्यातून मला बाहेर काढू नका, अशी नोटीस बजावल्याने या बंगल्याचे संग्रालय कसे कराचे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
या बंगल्याचे संग्राहालय करण्याचा मानस दोन्ही मुलींचा आहे. परंतु अनिताची नोटीस आल्याने आता 'आशीर्वाद'चे संग्राहालय करायचे की नाही याचा निर्णय त्यांच्या मुली ट्विंकल आणि रिंकी घेणार असल्याचे बोलले जात आहे. राजेश खन्ना यांनी 'आशीर्वाद' बंगला राजेंद्र कुमार यांच्याकडून खरेदी केला होता. राजेश खन्ना तब्बल २०० कोटींची संपत्ती सोडून गेले आहेत. त्यांच्या नावावर वर्सोवामध्ये फ्लॅट, मड आयलॅण्डमध्ये बंगला, लिंकिंग रोडवर ऑफीस स्पेस, चेन्नईमध्ये प्रॉपर्टी, आशीर्वाद थिएटर व्यतिरिक्त अंधेरी स्थित फिल्मालयामध्ये भागीदारी आहे.
सुपस्टार खन्ना यांनी २००८-०९ या वर्षात तबब्ल ६.८७ कोटी कर भरुन आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे आयकर विभागाने त्यांचा 'आशीर्वाद' बंगला सील केल्याचीही बातमी आली होती. परंतु त्यांनी आपल्या संपत्तीतला काही भाग विकल्यामुळे त्यांनी कर भरत अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकले होते. अमिताभ यांनी त्यावर्षी म्हणजेच २००८-०९ मध्ये १.२५ कोटींचा कर भरला होता. तर राजेश खन्नांच्या कराची रक्कम तब्बल ६.८७ कोटी एवढी होती.