काका परिवार आणि अनिता अडवाणीमध्ये तडजोड

दिवंगत राजेश खन्ना यांच्या संपत्तीवरून वाद निर्माण झाला. हा वाद न्यायालयात गेला. त्यामुळे फैसला कोणाच्या बाजुने लागणार याची उत्सुकता होती. मात्र, निर्णय टाय झाला. कारण लिव-इन पार्टनर अनिता अडवाणी आणि राजेश खन्नास परिवार, पत्नी डिंपल, अक्षय, ट्विंकल यांच्यामध्ये समझोता करण्यास सहमती दर्शविली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 28, 2012, 04:22 PM IST

www.24taas.com, मुंबई
दिवंगत राजेश खन्ना यांच्या संपत्तीवरून वाद निर्माण झाला. हा वाद न्यायालयात गेला. त्यामुळे फैसला कोणाच्या बाजुने लागणार याची उत्सुकता होती. मात्र, निर्णय टाय झाला. कारण लिव-इन पार्टनर अनिता अडवाणी आणि राजेश खन्नास परिवार, पत्नी डिंपल, अक्षय, ट्विंकल यांच्यामध्ये तडजोड करण्यास सहमती दर्शविली आहे.
अभिनेता आणि बॉलीवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत १० वर्ष सोबत राहण्याचा दावा करणारी आणि लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये असणारी अनिता अडवाणीने आपण आशीर्वाद बंगल्याचा एक हिस्सा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे संपतीबाबत नवा वाद निर्माण झाला होता. अनिता विरूद्ध डिंपल, राजेश खन्ना यांचा जावई अक्षय, त्याची पत्नी आणि राजेश खन्नाची मुलगी ट्विंकल असा वाद रंगला.
त्यामुळे संपतीचा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाने या सर्वांना समक्ष उपस्थित राहण्याचे सांगितले होते. याचवेळी संपत्तीबाबतचा वाद आपसाद सोडविण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार या वादावर तोडगा निघाला आहे. अनिता अडवाणीशी समझोता करण्याचे ठरले.
२००३पासून आपण आर्शीवाद बंगल्यात राहत असल्याचे अनिताने म्हटले आहे. बांद्रा येथील आर्शीवाद बंगल्यातून आपल्याला हाकलून दिले, अशी अनिताने तक्रार केली होती. त्यानुसार नोटीसही बजावण्यात आली होती. त्यामुळे हिंसाचार कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता होती. त्यामुळे वादावर तोडगा काढण्यात आल्याची शक्यता आहे.
त्याआधी अनिताने नवा खुलासा केला होता. अनिताने सांगितलं आहे की, ती जेव्हा १४ वर्षाची होती तेव्हा राजेश खन्नाने एक दिवस अचानक तिला त्याच्या मिठीत घेतलं आणि तिचं दिर्घ चुंबन घेतलं. आणि त्यानंतर तिचं लैगिंक शोषण केलं. त्यामुळे या नव्या खुलाशामुळे वादंग निर्माण झालाय.

४ डिसेंबरला न्यायालयासमोर पत्नी डिंपल, मुली ट्विंकल आणि रिंकी तसेच जावई अक्षय याला उपस्थित राहावे लागणार आहे. दरम्यान, काकाच्या कुटुंबाशी तोडगा करण्यास आपली काही हरकत नसल्याचे अनिताने म्हटले आहे. त्यामुळे अनिता आणि काकाच्या कुटुंबाशी तडजोड होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काकाची ५०० कोटींची मालमत्ता आहे. त्यापैकी मला दरमहा भत्यापोटी १० लाख रूपये आणि आशीर्वाद बंगला हवा, अशी अनिताने मागणी केली आहे.