एक होता सुपरस्टार...

ऱाजेश खन्ना हे नाव उच्चारलं की नजरेसमोर येणारा पहिला शब्द म्हणजे सुपरस्टार.. राजेश खन्नाची जादू स्क्रीनवरची जादू काही काळानंतर ओसरली असली तरी प्रत्येकाच्या मनात विराजलेला सुपरस्टार नेहमीच टॉपवर राहीला. एका टॅलेंट हंटद्वारे सिनेसृष्टीत आलेला चेहरा सुपरस्टार कधी बनला ते कळलंच नाही.

Updated: Jul 18, 2012, 11:45 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

ऱाजेश खन्ना हे नाव उच्चारलं की नजरेसमोर येणारा पहिला शब्द म्हणजे सुपरस्टार.. राजेश खन्नाची जादू स्क्रीनवरची जादू काही काळानंतर ओसरली असली तरी प्रत्येकाच्या मनात विराजलेला सुपरस्टार नेहमीच टॉपवर राहीला. एका टॅलेंट हंटद्वारे सिनेसृष्टीत आलेला चेहरा सुपरस्टार कधी बनला ते कळलंच नाही. राजेश खन्नाचा सुपरस्टारपदापर्यंतचा प्रवासही स्वप्नवतच होता.

 

राजेश खन्ना.. अनेक तरुणीच्या हृद्याचा सम्राट आणि बॉलीवुडचा सुपरस्टार आज दूरच्या प्रवासाला निघून गेलाय. ‘आनंद’ चित्रपटात मृत्यूला वाकुल्या दाखवणा-या या आनंद सहगलन आज फक्त ‘बाबू मोशाय’लाच नव्हे तर करोडो फॅन्सना जगण्याचा निखालस आनंद वाटत चाहत्यांना अलविदा केलाय.. गेले काही दिवस आजारी असणारा हा सुपरस्टार आजही मृत्यूला वाकुल्या दाखवेल अस वाटलं होतं.. पण आज मात्र मृत्यूला नाही फसवता आलं...

 

आज कुठल्याही अभिनेत्यानं कितीही स्ट्रगल केलं तरी राजेश खन्ना एवढी क्रेझ मिळवणं केवळ अशक्य.. लाखो तरुणींनी आपल्या रक्तानं लिहीलेली प्रेमपत्र, राजेश खन्नाची एक झलक पाहण्यासाठी हजारो तरुणींचं वेड्यासारखं त्याच्या घराबाहेर उभं असणं, राजेश खन्नाच्या फोटोशी त्यांनी केलेला विवाह, सारं काही परीकथेसारखंच.. पण असं जरी असलं तरी,  या परिकथेतल्या राजकुमाराचं वैयक्तिक आय़ुष्यातला ड्रामा मात्र एखाद्या चित्रपटाएवढाच टर्न आणि ट्विस्टवालाच राहीलाय...

 

राजेश खन्ना या वादळाची ख-या अर्थानं ‘आराधना’ पासून सुरु झाली त्यानंतर मजल दरमजल करत राजेश खन्नांचा प्रवास सुरु झाला तो सुपरस्टारपदापर्यतं.. आराधना, कटी पतंग, आनंद, आन मिलो सजना,  हाथी मेरे साथी,  अंदाज, बावर्ची, आप की कसम,  नमक हराम, दो रास्ते, अमरप्रेम, सफर,दाग, रोटी... अशा किती चित्रपटांची नाव घ्यायची.. कर्णमधुर संगिताबरोबरच रसिकांच्या लक्षात राहीले ते काकाचे डायलॉग.राजेश खन्ना यांच्या जाण्यानं बॉलीवूड एका सुपरस्टारला मुकलाय.. आपण फक्त आनंद चित्रपटातील बाबू मोशायसारख एवढंच म्हणायचं.. आनंद कभी मरते नही, आनंद कभी मरा नही करते...