10
10
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आज एका दमात 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम करणार आहे. आज सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी श्रीहरीकोटाहून इस्रोचे अत्यंत भरवशाचे प्रक्षेपक पीएसएलव्हीच्या PSLV C 37 द्वारे ही मोहीम पार केली जाणार आहे.
उत्तर प्रदेशातील दुस-या टप्प्यातील मतदान आज आहे. दुस-या टप्प्यात ११ जिल्ह्यातील ७६ जागेसाठी मतदान आहे. या भागांत ७२१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
रोहित वेमुला दलित नसल्याचं पुढे आलंय. रोहित वेमुलाकडे असणारं जातीचं प्रमाणपत्र बनावट असून ते रद्द करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
काश्मीरच सीमेलगत झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत लष्काराचे चार जवान शहीद झालेत. तर चार दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आले आहे.
उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याप्रकरणी शशिकला यांना चार वर्ष तुरुंगवास आणि 100 कोटींच्या दंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे.
ओ. पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त आहे. जाता जाता शशिकला यांनी पनीरसेल्वम यांना दणका दिला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यासाठी विक्रमी मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. पहिल्या टप्प्यात ८३९ उमेदवारांची भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे.
मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून २१ फेब्रुवारी मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
भारत - बांग्लादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ३५६ धावा केल्यात.
नोटबंदीनंतर आता सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादा आरबीआय फेब्रुवारी अखेरपर्यंत हटवण्याची चिन्हं आहेत.