रिझर्व्ह बँक गृहकर्जदारांना आज दिलासा देणार का?

सणासुदीच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल आज गृहकर्जदारांना दिलासा देतात का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे.

PTI | Updated: Oct 4, 2016, 09:03 AM IST
रिझर्व्ह बँक गृहकर्जदारांना आज दिलासा देणार का? title=

नवी दिल्ली : सणासुदीच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल आज गृहकर्जदारांना दिलासा देतात का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे.

सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं एकत्र येऊन स्थापन केलेल्या पतधोरण निश्चिती समितीच्या माध्यमातून आज पहिलं पतधोरण जाहीर होणार आहे. काल दुपारी या पतधोरण निश्चिती समितीची पहिली बैठक झाली. त्यात देशातील महागाई, विकासदर आणि व्याजाचे दर याची उत्तम सांगड कशाप्रकारे घालता येईल यावर चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

या चर्चेनंतर आज दुपारी अडीचच्या सुमारास डॉ. उर्जित पटेल पतधोरणाचा आढवा घोषित करतील. बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते व्याजाच्या दरात कपात होण्याची शक्यता अत्यंत कमी असली, तरी शेअर बाजारानं आशा सोडलेली नाही. बाजार तज्ज्ञांच्या मते उर्जित पटेल यांना व्याजाच्या दरात पाव टक्का कपात करण्याची संधी आहे. पण ही संधी ते आता घेतात की डिसेंबरच्या पतधोरणाच्या वेळी व्याजाच्या दरात कपात करतात याकडे बाजाराचं लक्ष आहे.