मणिपूर : विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला पुन्हा यश मिळाले आहे. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी नागा पीपल्स फ्रंट कोणाला पाठिंबा देणार यावरच सगळे गणित अवलंबून आहे. दरम्यान, राज्यपाल काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी प्रथम बोलविण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस आपल्या गळाला कोणाला लावते याकडे लक्ष लागले आहे.
दोन दिवसांपूर्वीच आलेल्या एक्झीट पोलचा कौल भाजपच्या बाजूने होता. मात्र, हा कौल चुकीचा ठरला आहे. सुरूवातीच्या टप्प्यातील मतमोजणीत स्पष्टपणे आघाडीवर होता. त्यामुळे एक्झीट पोलचा अंदाज चुकला. काँग्रेसला 28 तर भाजपला 21 जागा मिळाल्या आहेत. भाजपने जोरदार मुसंडी मारली तरी सत्तेसाठी लागणारी मॅजिक फिगर गाठता आलेली नाही.
सुरुवातीपासूनच भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना येथे पाहायला मिळाला. दोन्ही पक्षात चुरशीचा सामना दिसत होता. मात्र, काँग्रेसने बाजी मारली. तर इरोम शर्मिला यांचा पिपल्स रिसर्जंस अॅण्ड जस्टिस अलायन्सला जोरदार फटका बसला.