अमेरिकेत भारतीयाची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेमध्ये एका भारतीय तंत्रज्ञाची वर्णद्वेशातून हत्या करण्यात आली.. मुळचा हैदराबादचा असलेल्या श्रीनिवास कुचीभोतला याला 'माझ्या देशातून निघून जा' असं ओरडत एका निवृत्त नौसैनिकानं गोळ्या घातल्या.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 25, 2017, 08:47 AM IST
अमेरिकेत भारतीयाची गोळ्या झाडून हत्या title=

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये एका भारतीय तंत्रज्ञाची वर्णद्वेशातून हत्या करण्यात आली.. मुळचा हैदराबादचा असलेल्या श्रीनिवास कुचीभोतला याला 'माझ्या देशातून निघून जा' असं ओरडत एका निवृत्त नौसैनिकानं गोळ्या घातल्या.

या हल्ल्यात आणखी एक भारतीय तंत्रज्ञ आलोक मदासानी गंभीर जखमी झालाय. तर त्यांचा तिसरा अमेरिकन सहकारी इयान ग्रीलोट या दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात किरकोळ जखमी झालाय. अॅडम प्युरिन्टन असं या हल्लेखोराचं नाव आहे.

कन्सास शहरातल्या ओलेद इथल्या ऑस्टिन बार अँड ग्रीलमध्ये ही घटना घडलीये. या प्रकारामुळे अमेरिकेत खळबळ उडालीये. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टीकेला नवी धार आली असताना ट्रम्प यांच्या भाषणांची या हत्येचं संबंध जोडू नये, असं स्पष्टीकरण व्हाईट हाऊसने दिले आहे. या प्रकरणाची फार्स्ट ट्रॅक चौकशी करण्याची मागणी भारतानं केली आहे.