नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा चलन टंचाईचं सावट घोंगावला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जेवढे पैसे लागतील तेवढेच काढा, असे आवाहन करण्यात आलेय. त्याचवेळी 1000 रुपयांची नोट चलनात पुन्हा येणार नाही, असे वित्त सचिव शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे.
एटीएम आणि बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा वाढल्यावर आता देशातल्या अनेक भागातून एटीएममध्ये पैसे नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यावर गरजे पुरतीच रोकड काढण्याचं आवाहन सरकारने केले आहे.
शिवाय वित्त सचिव शक्तिकांता दास यांनी यापुढे सरकारचं लक्ष पुन्हा एकदा छोट्या नोटांच्या छापाईवर केंद्रीत असेल असंही स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे 1 हजाराच्या नोटा पुन्हा बाजारात येणार नसल्याचंही वित्त सचिवांनी ट्वीटरवर म्हटलं आहे.