नवी दिल्ली : काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या आर्थिक निधीचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने फुटीरतावादी नेत्यांसह अन्य काही ठिकाणी रविवारी पुन्हा छापे घातले. यामध्ये पाकिस्तानी चलनासह अन्य परदेशी चलन हस्तगत करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या अधिका-यांनी दिली.
या छाप्यांमध्ये काही हजार पाकिस्तानी रुपये तसेच संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाचे चलन तसेच काही कागदपत्रे आढळली. ही सर्व कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्यांनी दिली.यात सय्यद अली शाह गिलानी याच्या नेतृत्वाखालील तेहरीक-ए- हुर्रियतचा प्रवक्ता अयाझ अकबर याच्या घरी छापे घालण्यात आले.
J&K: NIA raids premises of a dry fruit dealer GM Traders in Jammu's Gandhi Nagar area. pic.twitter.com/HTtR9jMhAy
— ANI (@ANI_news) June 4, 2017
भारत-पाकिस्तान सीमेवरून होणा-या व्यापारातील घोटाळ्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या एका व्यापाऱ्याच्या जम्मूतील घरावर तसेच गोदामावरही छापे घालण्यात आले. काश्मिरातील उरी आणि जम्मूतील चकन-दा-बाद येथील सीमेवरून होणारा व्यापार वस्तू विनिमयावर आधारित असल्याने काही व्यापारी याबाबतची बिले कमी वा अधिक रकमेची दाखवून त्यातील तफावतीची रक्कम ही काश्मीर खोऱ्यात विघातक कारवायांसाठी पुरवत आहेत, असा एनआयएचा आरोप आहे.