बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगीची प्रकृती गंभीर

बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगी याची प्रकृती बिघडली आहे. त्याचा मृत्यू झालेला नाही, असे स्पष्टकरण अब्दुलच्या  कुटुंबीयांनी माध्यमासमोर दिलेय. त्यामुळे कालपासून जे वृत्त पसरले होते ती अफवा होती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 24, 2017, 08:20 AM IST
बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगीची प्रकृती गंभीर title=

बंगळुरु  : बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगी याची प्रकृती बिघडली आहे. त्याचा मृत्यू झालेला नाही, असे स्पष्टकरण अब्दुलच्या  कुटुंबीयांनी माध्यमासमोर दिलेय. त्यामुळे कालपासून जे वृत्त पसरले होते ती अफवा होती. दरम्यान, पीटीआयने त्याची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचे म्हटलेय.

स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील प्रमुख असलेला अब्दुल याची तीन दिवसांपूर्वी तब्बेत बिघडलेय. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. मेनिन्जायटीस या आजाराने तेलगी त्रस्त आहे. त्याला येथील व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची तब्बेत गंभीर असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिलेय.

तेलगीला ३० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील तो मुख्य असून तो दोषी आहे. तो सध्या बंगळुरुमधील परपन्न जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. तीन दिवसांपूर्वी त्याची तब्बेत बिघडली. तेलगीचे कुटुंबीय खानापूरमधून बंगळुरुमध्यो दाखल झाले आहेत. ७.३० वाजता डॉक्टरांची  त्याची तब्बेत गंभीर असल्याची माहिती दिली, अशी माहिती  त्याच्या कुटुंबीयांनी दिली असल्याचे  एएनआयने या वृत्तसंस्थेने दिलेल्लाय वृत्तात म्हटलेय.