नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने दिवाळीसाठी खास दिल्ली मुंबई दरम्यान आठवड्यातून तीनवेळा विशेष राजधानी एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या १६ ऑक्टोबरपासून ही राजधानी धावणार आहे. तशी घोषणा आज रेल्वे मंत्रालयाने केली.
दिल्ली आणि मुंबईच्या प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची जलदगती रेल्वे सुरु करण्याची मागणी होती. या दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राची मागणी पूर्ण केली आहे. येत्या १६ ऑक्टोबरपासून हजरत निजामुद्दीन ते बांद्रा टर्मिनस आणि ब्रांद्रा टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन दरम्यान ही गाडी धावणार आहे.
दिल्ली मुंबई के बीच यात्रा करने वालों के लिये नई राजधानी ट्रेनः यह यात्रा के वर्तमान समय से 2 घंटे कम लेगी, जिससे यात्रियों का समय बचेगा। pic.twitter.com/nXVQOpCBvL
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 14, 2017
आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि शनिवार अशी तीन दिवस ही गाडी धावणार आहे. या गाडीच्या तिकीटांची बुकिंग केल्यावर फ्लेक्सी भाडे आकारले जाणार नाही. सध्याच्या राजधानी प्रवासास १५ तास ५० मिनिट लागतात. नवीन राजधानीचा प्रवास १३ तास ५५ मिनिटाचा असणार आहे. यामुळे दोन तासाचा प्रवास कमी होणार आहे.
2/Ministry of Railways introduces tri- weekly new Special Rajdhani between Delhi – Mumbai route from 16th October, 2017. pic.twitter.com/F1VGfB8MAl
— Ministry of Railways (@RailMinIndia) October 13, 2017
या राजधानीच्या तिकिटाचे भाडे हे एसी २ व ३ साठी सध्याच्या राजधानीपेक्षा फ्लॅक्सी भाड्यापेक्षा १९ टक्के स्वस्त असणार आहे. या गाडीत कॅटरिंग सेवा पर्यायी असल्याने प्रवाशांना खानपान सेवेतून बाहेर पडण्याचा पर्याय असेल.
दिल्ली मुंबई रेल्वे मार्गावर सध्या दोन राजधानी व ३० मेल आणि एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. नवीन राजधानी एक्स्प्रेस दिल्ली- मुंबई दरम्यानच्या प्रवासात केवळ कोटा, वडोदरा, सूरत असे तीन थांबे असणार आहेत. ही गाडी तासी १३० कि.मी.वेगाने धावणार आहे.