सिद्धू ‘बिग बॉस’मधून बाहेर…

‘बीग बॉस सीझन ६’ मध्ये आपला डेरा जमवून बसलेला सिद्धू मात्र आता या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. पण, सिद्धूला घरातून बाहेर पडण्याचा आदेश बीग बॉसनं दिलेला नाही तर हा आदेश दिलाय भाजपच्या ‘बॉस’नं...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 9, 2012, 02:36 PM IST

www.24taas.com, मुंबई
‘बीग बॉस सीझन ६’ मध्ये आपला डेरा जमवून बसलेला सिद्धू मात्र आता या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. पण, सिद्धूला घरातून बाहेर पडण्याचा आदेश बीग बॉसनं दिलेला नाही तर हा आदेश दिलाय भाजपच्या ‘बॉस’नं...
सिद्धूची पत्नी आणि भाजपच्या आमदार असलेल्या नवज्योत कौर सिद्धू यांना पक्षाध्यक्ष नितीन गडकरींनी फोन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपला सिद्धूची गरज असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय.
गडकरींचा आदेश आल्यानंतर नवज्योत कौर यांनी संबंधित वाहिनीशी संपर्क साधून सिद्धू यांना बाहेर काढण्याची विनंती केली. गडकरींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही सिद्धू यांनी लवकरात लवकर बाहेर पडावं असं म्हटलं होतं.