विवेकानंद आणि दाऊदचा आयक्यू समान - गडकरी

पूर्ती कंपनीच्या गुंतवणूकदारांवरुन झालेल्या आरोपांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच नितीन ग़डकरी यांच्यावर आणखी एक वाद ओढावलाय. भोपाळमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा आयक्यू समान असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलयं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 5, 2012, 01:02 PM IST

www.24taas.com, भोपाळ
पूर्ती कंपनीच्या गुंतवणूकदारांवरुन झालेल्या आरोपांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच नितीन ग़डकरी यांच्यावर आणखी एक वाद ओढावलाय. भोपाळमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा आयक्यू समान असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलयं. विवेकानंदांनी त्यांच्या आयक्यूचा वापर समाजाच्या प्रगतीसाठी केला तर दाऊनने गुन्हेगारी साम्राज्य निर्माण करण्यासाठी त्याचा वापर केला असंही गडकरी यांनी म्हटलय.
वरवर साध्या वाटणा-या या वक्तव्यामुळं गडकरी यांना अडचणीत आणण्याची संधी विरोधक साधणार का? असं खासगीत बोललं जातयं. काँग्रेसनं नेमकी ही संधी साधत गडकरींवर निशाणा साधलाय. गडकरींचा आणि कसाबचा आयक्यू एकच असल्याचं कोण बोललं तर भाजपला चालेल का असा सवालच काँग्रेस नेते जगदंबिका पाल यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान, नितीन गडकरींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना थेट आव्हान दिलंय. आपल्यावर होत असलेले आरोप खोटे असले, तरी आपण त्याच्या चौकशीला तयार आहोत. सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांवर होत असलेल्या आरोपांच्या चौकशीला त्या तयार आहेत का, असा सवाल गडकरींनी केलाय.