ncp

लातूर मनपा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीची ही उडी

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेस-भाजप नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा लातूरच्या आंबेडकर चौकात पार पडली. ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Mar 29, 2017, 09:56 AM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांची आजपासून संघर्षयात्रा

तीन दिवसांच्या खंडानंतर आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाचा हा चौथा आठवडा असून विधानपरिषदमध्ये विरोधकांच्या आक्रमकपणामुळे अजिबात कामकाज झाले नाही.  तर विधानसभेत विरोधकांच्या बहिष्कारामुळे विधानसभा चर्चेत राहिलेली आहे.

Mar 29, 2017, 08:49 AM IST

आमदार फोडाफोडीची स्क्रीप्ट !

 मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होते, वेगवेगळ्या मुद्यांवर अत्यंत गहन चर्चा होते, ( त्यापैकी एक मुद्दा माध्यमांमध्ये बातमी काय पेरायची याची) आणि अशी ही बैठकीतील अत्यंत गुप्त चर्चा आणि त्यात ठरलेली संपूर्ण स्ट्रॅटर्जी मग कोअर कमिटीचे सदस्य चॅनल आणि वर्तमानपत्रांच्या राजकीय प्रतिनिधींना अत्यंत पारदर्शकपणे ( नाव न सांगण्याच्या अटीवर) सांगतात. आणि मग चॅनलवर सूत्रांच्या माहितीने बातम्या सुरू होतात आणि लाईव्ह शाईव्हही.... 

Mar 24, 2017, 07:37 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाही - सुनील तटकरे

 राज्यात सर्व विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नासह इतर प्रश्नांवर संघर्ष यात्रा काढणार आहेत, त्यामुळे ती होऊ नये यासाठी भाजपकडून अफवा पसरविण्याचे काम सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. 

Mar 23, 2017, 11:57 PM IST

कमी संख्याबळ असूनही झेडपीवर भाजपची बाजी...

 केवळ 14 एवढं संख्याबळ असतानाही सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपनं बाजी मारली. राष्ट्रवादीचे बंडखोर आणि स्वाभिमान संघटनेचे संजय शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांना भाजपनं निवडून आणलं. 

Mar 22, 2017, 07:46 PM IST

५५ वर्षात प्रथमच भाजप सेनेने घडविला इतिहास

मागील 55 वर्षात प्रथमच सांगली जिल्हा परिषदेवर भाजपा – शिवसेनेची सत्ता आली आहे. 

Mar 21, 2017, 11:10 PM IST

हिंगोलीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र

हिंगोलीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र

Mar 21, 2017, 08:47 PM IST

तुमच्या जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष? पाहा संपूर्ण यादी

राज्यात जि. प. अध्यक्षपद निवडणुकीतही भाजपची सरशी झालीये.  9 ठिकाणी भाजप आणि 1 ठिकाणी भाजप पुरस्कृत अध्यक्ष झालेत. तर शिवसेना, काँग्रसे आणि राष्ट्रवादीचे पाच ठिकाणी अध्यक्ष झालेत. या सगळ्या २५ जिल्हा परिषदांची आकडेवारी कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात. 

Mar 21, 2017, 07:26 PM IST

भाजप-राष्ट्रवादीची विचित्र युती, सेनेला धक्का

 राज्यात एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी विचित्र युती दिसत असताना बुलढाण्यात मात्र वेगळं चित्र दिसून आलं. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूनं घेत सेनेला दे धक्का दिलाय.  

Mar 21, 2017, 05:57 PM IST

उस्मानाबाद जि.प.मध्ये १० वर्षानंतर राष्ट्रवादी सत्तेत

 भाजपच्या ४ सदस्यांनी मतदानाला उपस्थित न राहून राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेताजी पाटील अध्यक्षपदी निवडून आले. 

Mar 21, 2017, 04:24 PM IST

'धनंजय मुंडे शरद पवारांपेक्षा मोठे झाले'

बीडमध्ये भाजपच्या खेळीनं विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंना जोरदार धक्का दिलाय.

Mar 21, 2017, 04:22 PM IST